राजू पोवार : जैनवाडीत पंचकल्याण महोत्सव
निपाणी : ‘जगा आणि जगू द्या’ असा संदेश जैन धर्माने समाजाला दिला आहे. त्याचे अनुकरण केल्यास समाज सुखमय होऊ शकतो. या समाजात त्याची वृत्ती असल्याने त्यांचा विकास होत आहे. समाजातील दानत आणि धार्मिक वृत्ती वाखानण्याजोगी आहे. त्यामुळे जैन समाजाच्या आचार विचार देशाला तारत आहेत, असे मत रयत संघटनेच्या चिक्कोडी जिल्हा अध्यक्ष राजू पोवार यांनी व्यक्त केले. जैनवाडी (ता. निपाणी) येथे पंचकल्याण प्रतिष्ठान महामहोत्सव सुरू आहे त्यानिमित्त आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते.
यावेळी राजू पोवार, बाळासाहेब हादीकर यांनी शेतकऱ्यांसाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचा महोत्सव कमिटीतर्फे १०८ सुयशगुप्तजी गुरुदेव व १०८ चंद्रगुप्तजी गुरुदेव यांच्या दिव्य सानिध्यात मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
त्यावेळी राज्याभिषेक दीक्षाकल्याण सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला. त्यानंतर सौधर्म इंद्र – इंद्रायणीसह मिरवणूक, नित्य पूजन व यागमंडल पूजा करण्यात आली. मौजीबंधन संस्कार सोहळा पार पडला. कार्यक्रमास नामदेव साळुंखे, कुमार पाटील, संदीप जोके, विवेक जनवाडे, तानाजी जोके, सुभाष देवर्षी, धनाजी पाटील, बाळू निपाणे, महेश पाटील, अरुण हुक्किरे, गणपती जोके, प्रकाश हुक्किरे, अरुण हुक्किरे, नेमिनाथ जोके, प्रभाकर उपाध्ये, रावसाहेब हुक्किरे त्यांच्यासह महाराष्ट्र व कर्नाटकातील विविध क्षेत्रातील मान्यवरांसह श्रावक- श्राविका उपस्थित होत्या.