Wednesday , July 22 2026
Breaking News

गुरुवंदना कार्यक्रमाची मुहूर्तमेढ उत्साहात

Spread the love

छत्रपती संभाजीराजे यांची उपस्थिती

बेळगाव : दि. 15 मे रोजी सकल मराठा समाजातर्फे होऊ घातलेल्या गुरुवंदना कार्यक्रमाची मुहूर्तमेढ आज दि. 9 मे रोजी सायंकाळी आदर्श विद्या मंदिराच्या पटांगणावर करण्यात आली. समाजाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या हस्ते महूर्तमेढ करण्यात आली. यावेळी शंकर बाबली यांनी पौरोहित्य केले. गुरुवंदना कार्यक्रमासाठी आदर्श विद्या मंदिराच्या पटांगणावर भव्य शामियाना उभारण्यात येणार आहे.
दरम्यान, गुरुवंदना कार्यक्रमासाठी कोल्हापूरहून छत्रपती संभाजीराजे, वाराणसी येथील स्वामी, गडहिंग्लज नुल येथील स्वामींजींचीही उपस्थिती लाभणार आहे.
गुणवंत पाटील यांनी गुरुवंदना कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्याचे आवाहन केले.
यावेळी मराठा समाजाचे नेते आमदार अनिल बेनके, किरण जाधव, रणजीत चव्हाण- पाटील, रमाकांत कोंडुस्कर, रमेश गोरल, महादेव पाटील, गोपाळ बिर्जे, पी. जे. घाडी, रमेश रायजादे, गुणवंत पाटील, सुनील जाधव, राहुल मुचंडी, सागर पाटील, उदय पाटील, कपिल भोसले, विशाल कंग्राळकर आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

जीआयटी आणि क्रेडाई यांच्यात समन्वय करार

Spread the love  बेळगाव : बेळगावच्या गोगटे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि क्रेडाई बेळगाव यांच्यात विद्यार्थ्यांना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *