कोगनोळी : येथील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असणार्या ग्रामदैवत बिरदेव देवाचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त हालसिद्धनाथ नगरातील बिरदेव मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळी सात वाजता बिरदेव मूर्तीस विठ्ठल भागोजी कोळेकर यांच्या हस्ते पंचामृत अभिषेक करण्यात आला. यावेळी विधिवत पूजन केले. मान्यवरांच्या उपस्थितीत जन्मोत्सव साजरा करण्यात आला. उपस्थित मान्यवर भाविकांच्या हस्ते पुष्पवृष्टी करण्यात आली. महिलांनी पाळणा गीत गायले. विठ्ठल नवलाप्पा कोळेकर यांच्या हस्ते आरती करण्यात आली. उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे व सुंठवड्याचे वाटप करण्यात आले.
सर्व धार्मिक कार्यक्रम पार पाडण्यासाठी सिद्धगोंडा कोळेकर, अजित कोळेकर, मायाप्पा कोळेकर, अण्णाप्पा गोरडे, काम्मांना कोळेकर, सिद्राम गोरडे, संजय कोळेकर, विठ्ठल धनगर, सुरेश गोरडे, यैवान कांबळे, आनंदा हंचिनाळे, हरिबा लोखंडे, जिनगोंडा पाटील, बापुसो पाटील, कुमार पाटील, महावीर पाटील, शिवाजी कागले, बिरू कोळेकर, शिंगाडी कोळेकर, कृष्णात कोळेकर, निवृत्ती जाधव आदींनी परिश्रम घेतले.
Belgaum Varta Belgaum Varta