Wednesday , December 10 2025
Breaking News

विविध देवदेवतांच्या मंदिरामुळे देशातील संस्कृती टिकून

Spread the love

परमात्मराज महाराज : दत्तवाडी येथे मंदिर कलशारोहन वास्तुशांती
कोगनोळी : विविध देवदेवतांच्या मंदिरामुळे देशातील संस्कृती टिकून आहे. संस्कृती टिकवून ठेवायची असल्यास मंदिरांची निर्मिती होणे गरजेचे आहे. प्रत्येकाने सद्गुरूच्या चरणावर शरण गेले पाहिजे. सद्गुरु संतुष्ट झाल्याशिवाय सुख, समाधान व शांती मिळत नाही. सर्वांनी एकत्र येऊन काम केल्याने संस्कृतीचे जतन होते. भारत देशामध्ये तीर्थक्षेत्रे वेगवेगळी असली तरीही देश अखंड आहे. 31 वर्षापूर्वी आपण सुरुवातीला या मंदिरात आलो होतो. यावेळी हे मंदिर लहान होते. वेळेनुसार मंदिराचा जीर्णोद्धार झाला. येथील नागरिकांच्यामुळे चांगल्या मंदिराची निर्मिती झाली आहे. असे प्रवचन येथील दत्त देवस्थान मठाचे परमात्मराज उर्फ राजीवजी महाराज यांनी व्यक्त केले.
दत्तवाडी तालुका निपाणी येथे दत्त मंदिर कलशारोहण व वास्तुशांती समारंभ प्रसंगी ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी कर्नाटक राज्याच्या मंत्री शशिकला जोल्ले या होत्या.
विठ्ठल खोत यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
यावेळी देणगीदार व विविध मान्यवरांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना मंत्री शशिकला जोल्ले म्हणाल्या, मंदिर व सद्गुरूच्या सान्निध्यात राहिल्याने समाधान मिळते. भारतीय संस्कृती प्रत्येकाने जपली पाहिजे. मंदिरासह संस्कृती टिकवण्यामध्ये युवकांनी योगदान दिले पाहिजे. दत्तवाडी येथे चांगल्या मंदिराची निर्मिती झाली आहे. आणखीन सुशोभीकरण करण्यासाठी आपल्याकडून सर्वतोपरी मदत करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
ग्रामपंचायत सदस्य राजगोंडा पाटील-टोपण दाम्पत्यांच्या हस्ते होम हवन व विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले.
यावेळी ग्रामपंचायत अध्यक्षा छाया पाटील, ग्रामपंचायत सदस्य सचिन खोत, सदस्या आक्काताई डूम, देवस्थान कमिटीचे अध्यक्ष रामचंद्र बिद्रोळे, विद्या व्हटकर, मुरारी कोळेकर, रयत संघटना निपाणी ग्रामीण युवा अध्यक्ष बाळासाहेब हदीकर, दीपक कदम, धनाजी कागले, रवींद्र चौगुले, जगन्नाथ खोत, संजय डूम यांच्यासह देवस्थान कमिटीचे सदस्य, ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सैनिक शाळेचे सचिव कुमार पाटील यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

निपाणीत शस्त्रधारी चोरट्यांकडून धाडसी घरफोडीचा प्रयत्न

Spread the love  चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद : चोरटे धावले पोलिसांच्या अंगावर निपाणी-(वार्ता) : शहरासह उपनगरात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *