कोगनोळी : येथील प्रजावाणी फाऊंडेशनचे संस्थापक स्वर्गीय नारायण कोळेकर यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त प्रजावाणी फाऊंडेशन व सिद्धगिरी चारिटेबल हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन धनगर समाज भवन येथे बुधवार तारीख 22 रोजी सकाळी दहा वाजता केले असल्याची माहिती प्रजावाणी फाऊंडेशनचे विठ्ठल मुरारी कोळेकर व सचिन परीट यांनी दिली.
या आरोग्य शिबिराचे उद्घाटन बेनाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी सलीम मुजावर यांच्या हस्ते तर दीपप्रज्वलन निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक अनिल कुंभार यांच्या हस्ते होणार आहे. या शिबिरामध्ये मेंदू विभाग, पोट विभाग, स्त्री आरोग्य व प्रस्तुती विभाग, कान-नाक-घसा विभाग, कॅन्सर विभाग, हृदय रोग विभाग, अस्थिरोग विभाग, दंत विभाग, नेत्र विभाग आधीच्या तपासण्या मोफत केल्या जाणार आहेत. तरी पंचक्रोशीतील नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांच्याकडून करण्यात आले आहे.
Check Also
बोरगाव पट्टणपंचायतीच्या निधीतून आयको परिसरात पाणी योजनेचे उद्घाटन
Spread the love निपाणी (वार्ता) : बोरगाव उपनगर असलेल्या आयको येथील मल्लिकार्जुन नगरमधील नागरिकांना अनेक …
Belgaum Varta Belgaum Varta