Monday , December 8 2025
Breaking News

शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढा देणार : राजू पोवार

Spread the love
निपाणीत रयत संघटनेचा रास्ता रोको
निपाणी (विनायक पाटील) : शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी लढणारे नेते अथवा कार्यकर्त्यावर अन्याय झाल्यास रयत शेतकरी संघटना कधीही शांत बसणार नाही. प्रसंगी रस्त्यावर उतरून जाब विचारला जाईल, असा इशारा चिकोडी जिल्हा रयत संघटनेचे अध्यक्ष राजू पोवार यांनी दिला.
शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय नेते राकेश टिकैत यांच्यावर ३०० कोटी रुपये घेऊन शेतकरी संघटनेचे आंदोलन मागे घेतले असा खेदजनक आरोप करण्यात आला. या आरोपाचे खंडन करण्यासाठी टिकैत यांनी बेंगलोर येथे पत्रकार परिषद घेऊन आपल्यावर झालेल्या आरोपांचे स्पष्टीकरण देत असताना त्यांच्यावर शाही फेक करण्यात आली. या घटनेचा निषेध व्यक्त व्यक्त करुन संबंधितावर कारवाई होण्याच्या मागणीसाठी तहसीलदारांना संघटनेतर्फे निवेदन देण्यात येणार होते. पण तहशिलदार उपस्थित नसल्याने संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला. त्यावेळी पोवार बोलत होते.
 तहसीलदार कार्यालयाला निवेदन देण्यासाठी रयत संघटना येणार असल्याची सूचना देऊन देखील निपाणी तहसील कार्यालयात तहसीलदार व शिरस्तेदार कोणीही उपस्थित नव्हते. त्यामुळे संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेऊन जुना पी. बी. रोड वरील राम मंदिरासमोर भर उन्हात ठिय्या आंदोलन करून अत्यावश्यक सेवा वगळता रास्ता रोखला. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण होऊन वाहतुकीची कोंडी झाली. अखेर निपाणी शहर पोलीस स्थानकाच्या उपनिरीक्षक कृष्णवेनी गर्लहसूर यांनी शेतकरी नेत्यांची समजूत घालून रस्त्यावरील ठिय्या आंदोलन बंद केले. यावेळी विविध प्रकारच्या घोषणा देत रयत संघटनेचे कार्यकर्ते तहसीलदार कार्यालयाकडे गेले.
 निवेदन प्रसंगी बाळासाहेब हादीकर, रमेश पाटील, सर्जेराव हेगडे, उमेश भारमल यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी कलगोंडा कोटगे, संजय स्वामी, नामदेव साळुंखे, शिवाजी वाडेकर, विठ्ठल रजपूत, संजय नाईक, एल. बी. खोत, सदाशिव शेळके, आनंदा किल्लेदार, राजेंद्र खोत, बाबासाहेब वडगावे, शिवगोंडा निकम, महेश जनवाडे, मलगोंडा मिरजे, बाळासाहेब पाटील, सुरेश चंदुरे, अण्णासाहेब खोत, शिवराम मोरे, रमेश मोरे, बबन जामदार, दिलीप कांबळे, अविनाश कांबळे, राहुल हवालदार यांच्यासह रयत संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बोरगाव पट्टणपंचायतीच्या निधीतून आयको परिसरात पाणी योजनेचे उद्घाटन

Spread the love  निपाणी (वार्ता) : बोरगाव उपनगर असलेल्या आयको येथील मल्लिकार्जुन नगरमधील नागरिकांना अनेक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *