Tuesday , March 3 2026
Breaking News

कोगनोळी येथे गव्या रेड्यांचे आगमन झाल्याचा अंदाज

Spread the love

कोगनोळी : परिसरातील हणबरवाडी दत्तवाडी या विभागात गवे रेड्याचे आगमन झाल्याचा अंदाज येथील शेतकरी वर्गातून व्यक्त केला जात आहे.
गेल्या दोन चार दिवसापासून गावातील विविध भागांमध्ये गव्याचे दर्शन झाले असल्याची चर्चा गावात सुरू आहे. यामुळे शेतकरी वर्गात घबराटीचे वातावरण पसरले आहे. प्रत्यक्ष कोणी पाहिल्याचे सांगत नसले तरी सोशल मीडियावर गवे आल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आहे. गावातील काही शेतकऱ्यांनी शेतात गव्याच्या पायाचे ठसे उठल्याचे निदर्शनास आले असल्याचे ही सांगत आहेत. पण प्रत्यक्षात गव्याचे दर्शन झाल्याचे कुणी सांगत नसल्याने गवे आलेत की नाही हा प्रश्न गंभीर झाला आहे. संबंधित वन विभागाने याकडे लक्ष देऊन ताबडतोब येथे येऊन बघून गवे आले की नाही याची शहानिशा करण्यात यावी, अशी मागणी येथील शेतकरी वर्गाकडून होत आहे.
दोन दिवसा पाठीमागे हणबरवाडी रोड येथे गवे आल्याची बातमी पसरली होती. शनिवार तारीख चार रोजी गवे हंचिनाळ रोडवरील मल्लेवाडी येथे आल्याची चर्चा सुरू झाली आहे.
गवे रेडे आल्याच्या बातमीने रात्री-अपरात्री शेतीसाठी पाणी देणाऱ्या शेतकऱ्यांची मोठी पंचाईत झाली आहे. सध्या ऊसाचे पीक जोमात असल्याने ऊसाला पाणी देणे गरजेचे असून पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांची अपरात्री शेताकडे फेरी होत असते. पण सध्या गवे रेडा आल्याच्या बातमीमुळे शेतकरी वर्गामध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.
या विभागांमध्ये गवे आपण पाहिले असे कोणी सांगत नसले तरी शेतामध्ये पायाचे ठसे उठल्याने शेतकरी वर्गामध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘पंचहमी’ योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी सहकार्य करावे

Spread the love  गॅरंटी योजना कमिटी अध्यक्ष रमेश जाधव ; निपाणी तालुका पातळीवरील बैठक निपाणी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *