बाबासाहेब खांबे : शिवसेनेतर्फे शिवराज्यभिषेक दिन
निपाणी (वार्ता) : छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य घडविण्यासाठी दिलेले योगदान महत्त्वपूर्ण आहे. त्यांनी आपल्या काळात सर्व जाती धर्माला एकत्र घेऊन राज्य केले होते. त्यांच्या अनेक मार्गदर्शक तत्वांचा आजही वापर केला जात आहे. त्यामुळे हीच तत्वे आज युवकांना प्रेरणादायी ठरत आहेत, असे मत शिवसेना जिल्हाप्रमुख बाबासाहेब खांबे यांनी व्यक्त केली. निपाणी शहर शिवसेनेतर्फे सोमवारी (ता.६) येथील मध्यवर्ती शिवाजी चौकात शिवराज्यभिषेक दिन सोहळा साजरा करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.
प्रारंभी रमेश निकम यांनी स्वागत केले. त्यानंतर महेश जाधव यांच्या हस्ते पूजा तर डॉ. बळीराम जाधव यांच्या हस्ते शिव पुतळ्यास अभिषेक घालण्यात आला. यावेळी ‘जय भवानी जय शिवाजी’च्या घोषणा देण्यात आल्या. कार्यक्रमास श्रीमंत दादाराजे निपाणकर- सरकार, सचिन सूर्यवंशी, संतोष पाटील, पंकज खटाव, उदय शिंदे, शीतल बुडके, विलास खटाव, सतीश यादव, अतुल यादव, दत्ता जोत्रे, अभय मानवी, रवींद्र इंगवले, दिपक इंगवले, उमेश भोपे, किरण पावले, विक्रम देसाई, सुनील शेलार, प्रताप पाटील, रवि कोरगावकर, प्रल्हाद शेळके, बाबासाहेब सुतार, सुनील राऊत, नगरसेविका रंजना इंगवले, सुभद्रा जाधव, शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक कृष्णवेनी गर्लहोसूर यांच्या शहर शिवप्रेमी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta