कोगनोळी : कोगनोळी येथील बेंदूर सण प्रसिद्ध असून कर्नाटक महाराष्ट्रातील मोठ्या संख्येने लोक बैलांची कर पाहण्यासाठी येत असतात. गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे बेंदूर सण साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला होता. चालू वर्षी कोरोनाचे प्रमाण कमी असल्याने बेंदूर सण मोठ्याने साजरा करण्यात येणार आहे. गावातील सर्वांनी मिळून बेंदूर सण साजरा करण्याचा आहे. बेंदूर सण हा सर्वांचा असल्याने सर्वांनी मिळून साजरा करूया कोणत्याही प्रकारचे गालबोट लागू नये यासाठी प्रत्येकाने दक्षता घेण्याची गरज असल्याचे मनोगत माजी मंत्री वीरकुमार पाटील यांनी व्यक्त केले.
कोगनोळी तालुका निपाणी येथे वीर सदन निवासस्थानी बेंदूर सणानिमित्त आयोजित बैठकीत ते बोलत होते.
प्रमुख उपस्थिती म्हणून माजी तालुका पंचायत सदस्य प्रीतम पाटील हे होते.
के. डी. पाटील यांनी स्वागत करुन प्रास्ताविकात गावातील होणार्या सण समारंभाची माहिती देऊन सर्वानी बेंदूर सण शांततेत साजरा करण्याचे आवाहन केले.
यावेळी माजी मंडल पंचायत प्रधान शरद पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
या बैठकीला प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघाचे चेअरमन अनिल चौगुले, संजय पाटील, योगेश पाटील, दिलीप पाटील, कृष्णात खोत, अनिल पाटील, बाळासाहेब पाटील, जगन्नाथ खोत, अरुण मानकापूरे, जहांगीर कमते, बशीर गडवाले, मन्सूर शेंडूरे, ग्रामपंचायत सदस्य राजगोंडा पाटील, धनंजय पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, विविध सेवा संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ, युवक मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
