Wednesday , March 4 2026
Breaking News

’गोमटेश’च्या वर्धापन दिनी चित्रकला स्पर्धा उत्साहात

Spread the love

निपाणी (वार्ता) : बेळगाव येथील गोमटेश विद्यापीठ संचलित येथील हनुमान नगरातील गोमटेश इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये संस्थेचा वर्धापन दिन आणि पंकज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून प्रियांका पाटील उपस्थित होत्या. तर अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष उदय पाटील हे होते.
प्राची शहा यांनी स्वागत केले. उदय पाटील म्हणाले, गोमटेश विद्यापीठ संचलित गोमटेश इंग्लिश मिडीयम स्कूल एक अग्रगण्य संस्था म्हणून नावारूपास आली आहे. शाळेने 21 वर्षे पूर्ण केली आहेत. सर्वसामान्यांना शिक्षण मिळावे, या उद्देशाने सुरू केलेल्या या संस्थेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे. ज्ञान, संस्कार आणि शिस्त या त्रिसूत्रीवर शाळेची उभारणी झाली आहे. सुशिक्षित वर्गास शिकवणे हे खूप सोपे असते. पण अशिक्षित वर्गातील विद्यार्थ्यांना शिकवून त्यांना घडवण्याचे कार्य गोमटेशने पार पाडले आहे. मुख्याध्यापिका दिपाली जोशी यांनीही मनोगत व्यक्त केले.
चित्रकला स्पर्धेस विद्यार्थ्यांना पावसाळी दिवस, माझी शाळा, मंदिर, वसुंधरा दिन, स्वच्छ भारत आणि कोरोनाव्हायरस असे विषय देण्यात आले होते विद्यार्थ्यांनी उत्साहात त्यामध्ये भाग घेतला. कार्यक्रमास भारती चौगुले, अश्विनी हत्ती, वर्षा केनवडे, सुभाष इंगळे शिक्षक उपस्थित होते. वैशाली देशमाने यांनी सूत्रसंचालन केले. तर शोभा इंगळे यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

निपाणी परिसरात होळीचा सण भक्तीभावाने

Spread the love  आता सर्वांनाच रंगपंचमी सणाची आतुरता निपाणी (वार्ता) : शहर, उपनगर आणि ग्रामीण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *