Wednesday , March 4 2026
Breaking News

पतीला मृत्यूच्या दाढेतून वाचविलेल्या आधुनिक सावित्रीचा गौरव

Spread the love

बोरगाव येथे पाटील दाम्पत्यांचा सत्कार : अष्टविनायक मित्र मंडळाचा उपक्रम
निपाणी (वार्ता) : कुटुंब सांभाळत संकटकाळी आपल्या पतीस मृत्युच्या दाढेतून सुटका करण्यासाठी जेंव्हा महिला धडपडते तीच खरी सावित्री बनते. पती संदीप पाटील यांना किडनी देऊन त्यांचा प्राण वाचवलेल्या राजश्री पाटील या खऱ्या अर्थाने आधुनिक सावित्री असल्याचे जाणुन बोरगाव येथील अष्टविनायक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी या दाम्पत्याचा सत्कार केला.
शरद पवार यांनी, आपण दंतकथामध्ये वटपौर्णिमेचे महत्व जाणून घेतो. पण राजश्री पाटील यांनी सावित्रीची भूमिका घेऊन पतीचे प्राण वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. आपले पती मृत्यूच्या दाढेतून पार व्हावेत, यासाठी त्यांनी स्वतःची किडनी देऊन त्यांचे प्राण वाचवले आहे. हे कार्य सर्वच महिलांना प्रेरणादायी ठरणार आहे. राजश्री पाटील यांनी केलेल्या हे महान कार्यामुळे त्या खऱ्या आधुनिक सावित्री असल्याचे सांगितले.
पती संदीप पाटील म्हणाले, माझी पत्नी राजश्री मुळेच मी जग पाहत आहे. तिने जर किडनी देण्यास नकार दिला असता तर कदाचित मी आज जिवंत राहिलो नसतो. तिच्या या दातृत्वामुळे आज आमचे कुटुंब सुखी आहे. तिचे ऋण मी आयुष्यभर फेडू शकणार नाही.
राजश्री पाटील यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे. यांच्या कार्याचा आदर्श सर्वांनी घेण्यासारखे असल्याचा संदेश अष्टविनायक मंडळाने दिला. कार्यक्रमास सागर पवार, सुभाष पोतदार, सुरेश सोमाने, विजय सुतार, किशोर पवार, निलेश उरणकर, बाळासाहेब बडीगेर, संदीप पवार, ज्योती पवार, विजय पवार, नितीन कोत्तलगे यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

निपाणी परिसरात होळीचा सण भक्तीभावाने

Spread the love  आता सर्वांनाच रंगपंचमी सणाची आतुरता निपाणी (वार्ता) : शहर, उपनगर आणि ग्रामीण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *