Wednesday , March 4 2026
Breaking News

महात्मा बसवेश्वर कुन्नूर शाखेतर्फे गुणी विद्यार्थ्यांचा सत्कार

Spread the love

निपाणी (वार्ता) : महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्द नियमित निपाणी, शाखा कुन्नूर यांच्यावतीने कुन्नूर येथील गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. कुन्नूर येथील ग्रामपंचायत सदस्य व गावकामगार पोलीस पाटील विजयराव जाधव यांची कन्या स्नेहा जाधव हिने धारवाड विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या एमएससी (भुभर्गशास्त्र) परीक्षेत यश संपादन केल्याने कर्नाटक चे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांच्या हस्ते प्रमाणपत्र व सुवर्णपदक देऊन गौरविण्यात आले होते. यावेळी शिक्षण मंत्री अशोक नारायण यांच्या उपस्थितीत हा सत्कार करण्यात आला होता. कुन्नूर येथील महात्मा बसवेश्वर बँक शाखा कुन्नूरचे व्यवस्थापक संजय जाधव यांची कन्या स्नेहल जाधव हिने बेळगाव येथील राणी चन्नम्मा विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या एमएससी(गणित) परीक्षेत विद्यापीठांमध्ये तीसरा क्रमांक मिळवल्याबद्दल या दोन्ही विद्यार्थीनीचा सत्कार महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्द शाखेतर्फे सत्कार करण्यात आला.
लावली शाखा अध्यक्ष सुनील तावदारे, उपाध्यक्ष किरण माने, संचालक शानुर तहसीलदार, आप्पासाहेब हळीज्वोळे, राजेंद्र पाटील, बाळासाहेब जाधव, अण्णासाहेब चव्हाण, अण्णासाहेब पोकळे यांच्यासह संचालक, सभासद व कर्मचारी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

लेटेक्स कॉलनीत मूलभूत सुविधा न दिल्यास नगरपालिके समोर नागरिकांचा उपोषणाचा इशारा

Spread the love  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील शहरा बाहेर असलेल्या लेटेक्स कॉलनीमध्ये बऱ्याच वर्षापासून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *