सौंदलगा : येथील मराठी मुलींच्या शाळेत एनआरजी फंडातून मंजूर झालेल्या पेव्हर ब्लॉक बसविण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ग्रामपंचायत सदस्य विनोद माने यांनी सर्वांचे स्वागत केले. यानंतर दादासाहेब कोगनोळे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कामाचा शुभारंभ करण्यात आला. यानंतर प्रास्ताविकात निपाणी भाग भाजप ग्रामीण जनरल सेक्रेटरी आनंद सुरवसे म्हणाले की, एनआरजी फंडातून पेव्हर ब्लॉक बसवण्याचे काम होत. असून हे काम उत्कृष्ट पद्धतीने केले जाईल. यामुळे शाळेचा परिसर सुशोभिकरण होत आहे. यावेळी माजी तालुका ग्रामपंचायत उपाध्यक्ष गणपती गाडीवड्डर, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश कांबळे, अरुण शिंदे, एसडीएमसी अध्यक्ष अजित कांबळे, सदस्य बंडा हातकर, माजी ग्रामपंचायत अध्यक्ष दादासाहेब कांबळे, शरद चौगुले, संजय आडसूळ, ग्रामविकास अधिकारी आशपाक शेख, मुख्याध्यापिका एस. जे. मेस्त्री, एस. जी. बाकळे, एस. के. मगदूम, व्ही. एम. नेजकर यासह विद्यार्थिनी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी आभार ग्रामपंचायत सदस्य विक्रम पाटील यांनी मानले.
Check Also
येशू ख्रिस्ताच्या जन्मोत्सवानिमित्त निपाणी चर्चमध्ये विविध कार्यक्रम
Spread the love निपाणी (वार्ता) : येथील कोल्हापूर वेसवर असलेल्या बागेवाडी कॉलेजसमोरील चर्चमध्ये बुधवारी (ता. …