कोगनोळी : येथील ग्रामपंचायत सदस्य राजगोंडा पाटील यांच्या वतीने सम्मेद शिखर्जी मोफत यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
यात्रेमध्ये एकशे तीस भाविकांचा समावेश असून सम्मेद शिखरजी येथील जैन मंदिराचे दर्शन घेऊन बिहार येथे असणार्या नालंदा पावापुरी येथील भगवान महावीरांच्या मोक्ष स्थळाचे दर्शन घेतले.
कुरुंदवाड येथील प्रदीप मगदूम यांनी भगवान महावीर यांची सविस्तर माहिती भाविकांना सांगितली.
यावेळी रुई येथील अडवोकेट सुरेश चौगुले यांनी भगवान महावीर यांच्या मोक्ष भूमीला आपण येऊन पवित्र झाल्याचे सांगितले.
यावेळी सैनिक शाळेचे सचिव कुमार पाटील, सैनिक शाळेच्या अध्यक्षा रेखा पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य शर्मिला पाटील, मंगल वरुटे, अशोक वंदुरे, नरसु पाटील, सुशांत पाटील, महावीर पाटील, अभी पाटील, सुवर्णा पाटील, सुरेखा पाटील, अजित पाटील, पूजा पाटील, बाहुबली पाटील, बाबुराव वरुटे, सतीश जाधव, विजय करनूरे, प्रवीण पाटील यांच्यासह अन्य भाविक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta