Sunday , July 26 2026
Breaking News

केंद्रीय मंत्री सोमप्रकाश यांची ऐतिहासिक ठिकाणांना भेट

Spread the love

बेळगाव : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री सोमप्रकाश यांनी मंगळवारी बेळगावातील विविध महत्वाच्या ऐतिहासिक ठिकाणांना भेटी देऊन माहिती घेतली. बेळगावातील किल्ला परिसरातील ऐतिहासिक कमलबस्ती, रामकृष्ण मिशन आश्रम आदी ठिकाणी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री सोमप्रकाश यांनी मंगळवारी भेट देऊन माहिती घेतली. 3 दिवसांच्या कर्नाटक दौर्‍यावर असलेल्या सोमप्रकाश यांनी सोमवारी सुवर्णसौधमध्ये अधिकार्‍यांची बैठक घेतली होती. त्यानंतर आज त्यांनी बेळगावती ऐतिहासिक स्थळांना भेट दिली. यावेळी त्यांच्या समवेत खा. मंगल अंगडी, जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ, आ. अभय पाटील, अ‍ॅड. अनिल बेनके, जिल्हाधिकारी नितेश पाटील, जिल्हा पंचायत सीईओ दर्शन एच. व्ही., बिम्स प्रशासकीय अधिकारी अफ्रिन बानू बळ्ळारी, तहसीलदार आर. के. कुलकर्णी, माजी आ. संजय पाटील आदी उपस्थित होते.
कमलबस्तीला भेट दिल्यानंतर सोमप्रकाश यांनी श्री रामकृष्ण मिशन मठाला भेट दिली. रामकृष्ण मिशनचे आत्मप्रसन्नानंद स्वामीजी, मुक्ती अमृतानंद स्वामीजी यांनी केंदीय मंत्री सोमप्रकाश यांना पुष्पगुच्छ आणि पुस्तके देऊन त्यांचे स्वागत केले. या ठिकाणी स्वामी विवेकानंद यांनी भेट देऊन वास्तव्य केले होते याची माहिती सोमप्रकाश यांना दिली.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *