राजू पोवार :आडी-पंढरपूरला पायी दिंडी रवाना
निपाणी (वार्ता) : माणसाने दररोजच्या धावपळीत अध्यात्मासाठी थोडा वेळ देणे आवश्यक आहे. अध्यात्मामुळे शरीर व मन स्थिर होण्यास मदत होते. सध्या अजूनही पावसाला सुरुवात झाली नसल्याने यंदा समाधानकारक पाऊस होऊन शेतकऱ्यांचे पीक उदंड पिकू दे यासाठी विठ्ठलाला साकडे घालत असल्याचे सांगितले.
आषाढी वारीनिमित्त आडी येथील वारकऱ्यांची पायी दिंडी गुरुवारी (ता.३०) पंढरपूरला रवाना झाली. यावेळी गावातील प्रमुख मार्गावरून दिंडी प्रदक्षिणा काढण्यात आली.
रयत संघटनेचे चिक्कोडी जिल्हा अध्यक्ष राजू पोवार यांच्या हस्ते येथील विठ्ठल मंदिरात दिंडीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर ते बोलत होते.
यावेळी टाळमृदुंग व विठ्ठल नामाच्या गजरात गावातील प्रमुख मार्गावरून पायी दिंडी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली.
या दिंडीचा मुक्काम बोरगाववाडी, नृसिंहवाडी, कळंबी, खोची, जिनुनी, सिद्धेवाडी, खरडी, पंढरपूर या ठिकाणी होणार आहे. दिंडी प्रस्थानप्रसंगी रयत संघटनेचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब हादीकर, मलगोंडा पाटील-बंदूक, बाबासो पाटील, नामदेव साळुंखे, कुमार पाटील, विलास गुरव, बाळू साळुंखे, नंदकिशोर गुरव, विजय गुरव, तानाजी पाटील, सिद्धू पडवाळे, आप्पासाहेब केरके, अनिल येडुरे, सिद्धेश्वर स्वामी, संदीप जोके, सर्जेराव हेगडे, भगवान गायकवाड, मलगोंडा मिरजे यांच्यासह वारकरी, ग्रामस्थ उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta