शिवाजी पठाडे यांचा उपक्रम : माऊलींच्या सेवेत भाविकही दंग
निपाणी (वार्ता) : गेल्या दोन वर्षापासून कोरोना महामारीमुळे पंढरपूरच्या दिंड्या बंद झाल्या होत्या. यंदा हा संसर्ग कमी झाल्याने प्रशासनाने त्यांना परवानगी दिली आहे. त्यामुळे विविध भागातून दिंड्या पंढरपूरकडे प्रस्थान करीत आहेत. खडकेवाडा येथील दिंडी निपाणी मार्गे पंढरपूरकडे दरवर्षी जात असते. यंदाही सदरची दिंडी पाणी मार्गे पंढरपूर कडे जात असताना येथील प्रगती नगरातील नागरिक शिवाजी पठाडे यांनी आपल्या घरी ही दिंडी मुक्कामाला ठेऊन वारकऱ्यांची सर्व ती सोय केली. त्यांच्या या स्नेहभोजनाचे यंदा सहावे वर्ष होते.
खडकेवाडा येथील माऊलीची दिंडी टाळ मृदुंगाच्या गजरात देवचंद कॉलेज मार्गे सायंकाळी येथील प्रगती नगरात पोहोचली. या दिंडीचे यंदा एकविसावे वर्ष होते. म्हाकवे येथील सिद्राम पाटील महाराज यांच्या नेतृत्वाखाली ही दिंडी पंढरपूर कडे निघाली आहे. प्रारंभी शिवाजी पठाडे दाम्पत्यांच्या हस्ते त्यांच्या निवासस्थानी माऊलीची पूजाअर्चा करण्यात आली. त्यानंतर सदरची दिंडी मुक्कामासाठी येथील जय मल्हार सांस्कृतिक भवनात आली. तेथे माऊली भजनी मंडळाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर वारकऱ्यांनी विविध प्रकारचे खेळ सादर केले. त्यामुळे भवन परिसर भक्तिभावाने न्हावून गेला. त्यानंतर वाडकर यासह परिसरातील भाविकांसाठी स्नेहभोजन याचे आयोजन करण्यात आले होते. शिवाजी पठाडे यांच्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.
यावेळी दिंडी चालक आनंदा शिंदे सूर्यकांत पाटील, भगवान सुतार, दगडू मिटके, तुकाराम भोसले, मालन वागळे, माजी नगरसेवक दिलीप पठाडे, नगरसेविका अनिता पठाडे, बाबुराव मलाबादे, माजी सभापती विश्वास पाटील, झुंजार दबडे, गजानन शिंदे, कृष्णा वडगावे, स्वाती दबडे, प्रवीण येजरे, सतीश बल्लारी यांच्या शहर प्रगतीनगर, आंदोलननगर परिसरातील भाविक उपस्थित होते.
