Wednesday , March 26 2025
Breaking News

चेंबर ऑफ कॉमर्सच्या पुरस्कारांचे 2 जुलै रोजी वितरण

Spread the love

बेळगाव : बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज यांच्या वतीने देण्यात येणार्‍या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. बेळगावचे जिल्हाधिकारी नितेश पाटील, व्हीटीयूचे रजिस्टर डॉ. आनंद देशपांडे आणि बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्सचे माजीअध्यक्ष पंचाक्षरी चोन्नद यांच्या उपस्थितीत या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.
शनिवारी 2 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजता फौंड्री क्लस्टर उद्यमबाग येथील सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
स्नेहम इंटरनॅशनल या संस्थेला 2021-22 यावर्षीचा इंडस्ट्रीयल डेवलोपमेंट प्रोजेक्ट आणि मॅन्युफॅक्चरिंगमध्ये दिलीप दामले मेमोरियल ट्रस्ट पुरस्कार.
दीपक कन्स्ट्रक्शन यांना यावर्षीचा बेस्ट ट्रेडर्स म्हणून बसप्पा बाळाप्पा कगणगी मेमोरियल अवॉर्ड बेस्ट अपकमिंग ट्रेडर्स पुरस्कार कै. मधुकर विठ्ठल हेरवाडकर यांच्या स्मरणात देण्यात येतो. हायटेक मोटर्स आणि ऑटोमोबाईल्स प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेला तर माणिकबाग ऑटोमोबाईल्स यांच्या वतीने देण्यात येणारा यावर्षीचा एक्सलन्स अवॉर्ड ऑटोमोबाईल आणि ट्रेड इंडस्ट्री म्हणून पॅटसन ऑटोमोबाईल प्रा. लिमिटेडला देण्यात येणार आहे. पुरस्कार वितरण कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष रोहन जुवळी तर सचिव प्रभाकर नागर मुनवळी यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

इंद्रप्रस्थ नगर येथे भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात दोन जण गंभीर जखमी

Spread the love  बेळगाव : इंद्रप्रस्थ नगर येथील एका अपार्टमेंट परिसरात सकाळी ५:३० वाजता भटक्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *