कोगनोळी : सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून नदीला नवीन पाणी आले आहे. यामुळे साथीचे आजार पसरू शकतात. नागरिकांनी पाणी गरम करून गार करून प्यावे, असे आवाहन ग्रामपंचायत अध्यक्षा छाया पाटील यांनी केले आहे.
परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे ओडे, नाले भरून वाहू लागले आहेत. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून कोरडे असलेले ओडे, नाले वाहू लागल्याने शेजारीच असणाऱ्या विहिरीमध्ये पाणी जात आहे. काही विहिरीमध्ये पावसाच्या पाण्यामुळे दूषित पाणी येत असल्याने नागरिकांनी पाणी उकळून गार करून पिणे आरोग्यास योग्य आहे.
त्याचबरोबर आपल्या परिसरामधील कचरा व टाकाऊ वस्तु याचे योग्य नियोजन करावे, घर व परिसरामध्ये पावसाचे पाणी थांबू नये यासाठी नियोजन करावे, किरकोळ आजार वाटल्यास ताबडतोब औषध उपचार घ्यावा, सध्या परिसरामध्ये थंड, ताप अंगदुखी आधीचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे नागरिकांनी ताबडतोब औषध उपचार करावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी ग्रामपंचायत उपाध्यक्ष तुकाराम शिंदे, सदस्य दिलीप पाटील, संजय पाटील, तात्यासाहेब कागले, कृष्णात खोत, युवराज कोळी, शिवाजी नाईक, प्रवीण भोसले, महेश जाधव, राजू शिंत्रे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta