नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन : यापुढेही नियम कडक
निपाणी : राज्य शासनाच्या निर्देशानुसार व बेळगाव जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार बोरगाव तपासणी नाक्यावर आणखीन कडक नियम केले आहेत. सर्व वाहन धारक व नागरिकांनी सहकर्य करण्याचे आवाहन निपाणीचे तहसिलदार डॉ. मोहन भस्मे यांनी केले आहे. शुक्रवारी (ता.24) आयको व पाचमैल चेक पोस्ट ठिकाणी उभारलेल्या ठिकाणीची पाहणी आज त्यांनी केली.
तहसीलदार डॉ. भस्मे म्हणाले, परराज्यातून कर्नाटक राज्यात प्रवेश करताना कोवीड आरटीपीसीआर हा रिपोर्ट सर्वांना बंधनकारक आहे. आरटीपीसीआर रिपोर्ट असल्यास कर्नाटक राज्यात प्रवेश दिला जाणार आहे. त्याच बरोबर कर्नाटक राज्यातील नागरिकही महाराष्ट्र राज्यात गेल्या नंतर याठिकाणी परत येताना रिपोर्ट जरुरीचे आहे. सदलगा पोलीस ठाणे मार्फत सर्व सीमा मार्ग बंद करण्यात आले आहेत. यासाठी सर्वांनी सहकार्य करणे गरजेचे आहे. तपासणी नाक्यावरून जवळच्या महाराष्ट्र राज्यातून दररोज शेकडो वाहने ये-जा करतात. यामध्ये चारचाकी व दुचाकी यांचाही समावेश आहे. कामगार, शेतकरी वर्ग आहे. पण सरकारच्या नियमानुसार सर्वांची तपासणी केली जाणार आहे. यासाठी सर्वांनी आरटीपीसीआर रिपोर्ट घेऊनच आपल्या राज्यात प्रवेश मिळवावा. तपासणी नाक्यावर तपासणी करण्यासाठी अंगणवाडी, अशा, शिक्षक होमगार्ड व पोलिसांची नेमणूक करण्यात आली आहे. आरटीपीसीआर रिपोर्ट नसल्यास त्यांना येथूनच परत पाठवीत आहेत. यासाठी सर्वांनी रिपोर्ट घेऊनच आपल्या राज्यात प्रवेश करावा. जिल्हा धिकार्यांच्या आदेशानुसार हा नियम सक्तीचा करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्याशी जोडणार्या सर्वच सीमा मार्गांवर तपासणी नाके उभारण्यात आले असून सर्व ठिकाणी कडक नियम करण्यात आले आहेत. बोरगाव तपासणी नाक्यावर पोलिसांनी अनेक वाहनांचे तपासणी करून आरटीपीसीआर रिपोर्ट नसलेल्यांना परत महाराष्ट्र राज्यात परत पाठविले आहेत. याबाबत सर्वांनी रिपोर्ट तपासूनच त्यानंतर वाहने सोडावे, अशी सूचना या वेळी चेक पोस्ट नाक्यावर असलेल्या अधिकार्यांना त्यांनी दिल्या.
Check Also
शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी अधिवेशनात आंदोलन
Spread the love राजू पोवार ; रयत संघटनेची गांधी भवनात बैठक निपाणी (वार्ता) : ओला …