Wednesday , March 4 2026
Breaking News

कोगनोळी दूधगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ

Spread the love

कोगनोळी : सोमवारी सकाळपासून कोगनोळीसह सीमाभागात संततधार पाऊस सुरु असून मंगळवारीही दिवसभर संततधार पाऊस सुरु होता. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणे मुश्किल होऊन बसले होते. या पावसामुळे येथील दूधगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत चालली आहे. मागील २४ तासात येथील दूधगंगा नदी पाणी पातळीत ५ फुटांची वाढ झाली आहे.
गेले कित्येक दिवस पावसाची आतुरतेने वाट पाहणारे दोन दिवस पडलेल्या पावसामुळे संभाव्य पुराच्या धोक्यामुळे नदीकाठावरील गावामध्ये भीतीचे वातावरण आहे. सन २०१९ व २०२० या सालातील महापूराच्या आठवणी ताज्या असतानाच यंदाही महापुराला सामोरे जाण्याची परिस्थिती निर्माण होते की काय? अशी भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.
मान्सून वेळेआधीच सुरु होणार असा हवामान खात्याने अंदाज वर्तविल्यानंतर आगमन तर दूरच जून महिना संपला तरी वरुण राजाने दडी मारली होती. त्यामुळे शेतीची कामे खोळंबण्यासह सर्वांनाच पावसाची प्रतीक्षा लागून राहिली होती. मात्र मागील दोन दिवसापासून परिसरासह धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे दूधगंगा नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत चालली आहे. मागील २४ तासात या पाणी पातळीत ५ फुटांनी वाढ झाली आहे.

About Belgaum Varta

Check Also

निपाणी परिसरात होळीचा सण भक्तीभावाने

Spread the love  आता सर्वांनाच रंगपंचमी सणाची आतुरता निपाणी (वार्ता) : शहर, उपनगर आणि ग्रामीण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *