कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 जवळ असणाऱ्या दुधगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. सध्या पाणी पात्राबरोबर वाहू लागले आहे.
गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे दुधगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. निपाणी व कागल तालुक्यात पाऊस थोडा कमी असला तरी कोकण पट्ट्यात पावसाचा जोर असल्याच्या कारणाने दुधगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.
आणखी दोन चार दिवस पावसाचा जोर जर असाच राहिला तर दूधगंगा नदीचे पाणी पात्रा बाहेर पडणार अशी शक्यता निर्माण झाली आहे.
पावसाचा जोर कायम राहिल्यास दूधगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर पडून आसपासच्या शेती शिवारामध्ये जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. निपाणी तहसीलदार डॉक्टर मोहन भस्मे यांच्या वतीने नदीकाठी असणाऱ्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
सध्या परिसरामध्ये सुरू असणारा पाऊस सुरुवातीला पेरणी करण्यात आलेल्या सोयाबीन व भुईमूग पिकास पोषक ठरत आहे. सध्या परिसरामध्ये सोयाबीन व भुईमूग पिके बहारदार आले आहे.
Check Also
तवंदी घाटात भीषण अपघात: एकाचा मृत्यू, १५ गंभीर जखमी
Spread the love बेळगाव : पुणे – बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटात भरधाव वेगात आलेल्या …