निपाणी (वार्ता) : येथील गोमटेश इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये आषाढी एकादशीचे औचित्य साधून बाल चमूंचा वारकरी दिंडी सोहळा झाला. या कार्यक्रमात नर्सरी छोटा गट, मोठा गट व इयत्ता पहिलीच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींचा सहभाग होता. जय हरी विठ्ठल, श्री हरी विठ्ठल नामाच्या गजरात शाळेच्या आवारात बाल वारकरी विठ्ठल रुक्माईच्या समवेत दिंडी निघाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महानंदा बक्कनवर यांनी केले. यावेळी बाल वारकरींचा फुगड्या रिंगण सोहळा झाला. तसेच सातवीतील विद्यार्थिनींनी भजन अभंग सादर केले. मुख्याध्यापिका ज्योती हरदी, दिपाली जोशी यांनी आषाढी वारीचे व पंढरपूरचे महत्त्व विषद केले. नंदिनी पाटील यांनी आभार मानले. यावेळी स्वाती चव्हाण, शहिस्ता सय्यद, शोभा इंगळे याच्यासह शिक्षक शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta