बोरगाव येथे क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन
निपाणी (वार्ता) : देशाची भावी पिढी अर्थात आजचे विद्यार्थी ज्ञानसंपन्न, गुणसंपन्न व त्या त्या प्रसंगाला धैर्याने तोड देणारे बनले पाहिजेत. यासाठी त्यांच्यामध्ये संस्कार, गुणवत्ता व कौशल्य ही त्रिसूत्री रुजविणे गरजेचे आहे, असे मत युवा नेते उत्तम पाटील यांनी व्यक्त केले. बोरगाव येथील आर. ए .पाटील पब्लिक स्कूल येथे सी.आर.सी. पातळीवरील क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उत्तम पाटील अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.
उत्तम पाटील म्हणाले, कोरोना नंतरच्या काळात सर्वांना आरोग्य बाबत काळजी वाटायला लागली आहे. कारण आपण सदृढ राहण्यासाठी आरोग्य हे फार महत्त्वाचे आहे. यासाठी दैनंदिन व्यायाम गरजेचे आहे. आजचा विद्यार्थी हा सदृढ व आरोग्यदायी बनविण्यासाठी शासनाच्या वतीने प्रत्येक वर्षी शाळांमध्ये क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. तरी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी प्रवृत्त करून क्रीडा स्पर्धेचे महत्व समजून द्यावे. विद्यार्थ्यांनीही आपल्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी क्रीडा स्पर्धेत सहभागी व्हावे.
वलय अधिकारी आर. एस. माळी यांनी, शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही खेळांचे महत्त्व समजावे. त्यासाठी प्रत्येक वर्षी शिक्षण खात्याकडून त्या त्या विभागात क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. आज ग्रामीण भागातील विद्यार्थी विविध क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी होऊन राज्य पातळीवर पोहोचत असल्याचे सांगितले
युवा नेते उत्तम पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन झाले. क्रीडा शिक्षक रामदास पाटील यांनी क्रीडा प्रतिज्ञा देऊन स्पर्धेचे नियम सांगितले.
कार्यक्रमास राजेंद्र कोकणे, प्रमोद माळी, नगरसेवक अभयकुमार मगदूम, अण्णासाहेब भोजकर पाटील, महादेव उलपे, दैहिक शिक्षणाधिकारी पी.एम. जोगळे, बाळासाहेब हावले, दयानंद सदलगे, चेतन जंगटे यांच्यासह बोरगाव परिसरातील २२ शाळांचे शिक्षक, विद्यार्थ, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. प्रकाश मडिवाळ यांनी सूत्रसंचालन केले. आर. एस. सावंत यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta