Monday , September 21 2026
Breaking News

आंबेडकर रिसर्च सेंटरला वाढीव निधी तात्काळ मिळावा

Spread the love
 प्रा.सुरेश कांबळे: समाज कल्याण अधिकाऱ्यांना निवेदन
निपाणी (वार्ता) : भारतीय समाज व्यवस्थेमध्ये हजारो वर्षाची रुढीपरंपरेच्या विरोधात ज्यांनी माणुसकीचे वैचारिक रणसंग्राम केला आणि माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार प्राप्त करून दिला अशा थोर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कर्नाटक भूमीमध्ये ज्या ज्या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आले. त्या ठिकाणी कर्नाटक सरकारने दहा एकर जमीन व दहा कोटी रुपये निधी अर्थसंकल्पामध्ये नमूद करून आंबेडकरी समाजाचा गौरव केला आहे. पहिल्या टप्प्यातील निधी मंजूर झाला असून वाढीव निधी तात्काळ मंजूर करावे या मागणीचे निवेदन डॉ. आंबेडकर विचार मंचसह विविध दलित समाजातर्फे समाज कल्याणमंत्र्यांना देण्यात आले. त्यावेळी असे मत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे निपाणी विभाग सदस्य व कर्नाटक राज्य स्मारक समिती निपाणी विभाग अध्यक्ष प्रा. सुरेश कांबळे बोलत होते.
प्रा. कांबळे म्हणाले, राज्य सरकारने तात्काळ एक कोटी रुपये मंजूर केला आहे. या निधीतून दहा ठिकाण पैकी निपाणीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर येऊन गेले होते. त्यामुळे निपाणीमध्ये भव्य असे डॉ. बी. आर. आंबेडकर रिसर्च सेंटर लवकरात लवकर दहा एकर जागेसह उभारणार आहे. निपाणी परिसरामध्ये येणाऱ्या काळामध्ये या संशोधन केंद्राच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना एक वैचारिक मानसिकता तयार करण्याच्या दृष्टीने हा निर्णय स्तुत्य आहे.
यावेळी राज्य सदस्य विजय मेत्रांणी, प्रवीण माने, अमित शिंदे, अशोक लाखे, गणू गोसावी, किसन दावणे, प्रवीण सौंदलगे, सर्जेराव हेगडे, भगवान गायकवाड, साजन घस्ते,  प्रतीक मधाळे, प्रकाश मधाळे, सातापा कांबळे, सचिन कांबळे, अभिजीत कांबळे, दीपक माळगे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *