कोगनोळी : चूल आणि मूल यातून महिलांनी बाहेर पडून उद्योग व्यवसाय केला पाहिजे. शिक्षणाबरोबर संस्कार शिकले पाहिजेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे महिलांचा विकास झाला असल्याचे प्रतिपादन मंत्री शशिकला जोल्ले यांनी केले.
येथील प्रियंका संकेश्वरे व महेश संकेश्वरे या दाम्पत्यांना मंत्री जोल्ले यांच्या विशेष प्रयत्नातून १० लाख रुपये मंजूर झालेल्या बेकरी प्रोजेक्टच्या शुभारंभप्रसंगी त्या बोलत होत्या.
प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन जोल्ले यांनी केले. कृषी खात्याचे अधिकारी शिवनगौडा पाटील यांनी प्रास्ताविकात महिला सबलीकरणासाठी शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली.
कार्यक्रमाची सुरुवात शेतकरी गीताने झाली.
मंत्री शशिकला जोल्ले व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
याप्रसंगी कोगनोळी भाजपाध्यक्ष कुमार पाटील, ग्रामपंचायत सदस्या विद्या व्हटकर, निपाणी ग्रामीण भाजपाध्यक्ष पवन पाटील, किरण गोरपाळकर आदींनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी हालशुगरचे संचालक प्रकाश शिंदे, तालुका पंचायत सदस्या अनिता देसाई, कृषी खात्याचे अधिकारी पुरुषोत्तम पिरजादे, मंजुनाथ जनगट्टी, एल. आय. कलगडी, मल्लेश कत्ती, लीला कौजलगी, सुनिल माने, बबलू पाटील, कुमार व्हटकर, विलास नाईक, धनाजी कागले, स्वाती शिंत्रे, वंदना चौगुले, आडी-हंचिनाळ ग्रामपंचायतीचे अध्यक्ष बबन हावलदार, सदस्य एम. वाय. हावलदार, माजी उपाध्यक्ष कुमार गुरव, सिद्धगोंडा वंदूरे, आप्पाचीवाडी ग्रामपंचायत अध्यक्षा शालन चव्हाण, उपाध्यक्ष आनंदा कुवाळे, सदस्य राजेश डोंगळे, माजी ग्रामपंचायत अध्यक्ष आनंदा यादव, के. बी. माने, माजी सैनिक शिवगोंडा पाटील, रणजीत माने, संजय देशपांडे, विद्या नुले, सुनिल घुगरे, बाळासो कागले, धनाजी कागले यांच्यासह कोगनोळी पंचक्रोशीतील भाजपा कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मनिषा पाटील यांनी सूत्रसंचलन केले तर सरोजिनी जमदाडे यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta