Tuesday , March 3 2026
Breaking News

सुभेदार मेजर गजानन चव्हाण यांचा उद्या निपाणीत गौरव समारंभ

Spread the love
निपाणी (वार्ता) :  भारतीय सेनेतून शांती सेनेच्या माध्यमातून दक्षिण आफ्रिकेतील कांगो देशात निपाणीचे सुपुत्र सुभेदार मेजर गजानन गोविंद चव्हाण यांच्या युनिटने कौतुकास्पद कामगिरी केली आहे. या विशेष बहुमानाबद्दलनिपाणी शहरवासीयांच्या वतीने त्यांच्या अभूतपूर्व कार्याची दखल घेत गुरुवारी (ता.२८) गौरव समारंभाचे आयोजन केले आहे.
 गेल्या काही महिन्यांपासून इंडियन रॅपिड रिप्लायमेंट म्हणून दक्षिण आफ्रिकेतील डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कांगो देशात संयुक्त राष्ट्र संघ शांती सेनेच्या माध्यमातून जगातील बारा देशांचे सैन्य दाखल झाले आहे. भारतातून गेलेल्या शांती सेनेत सेवन मराठा लाईट इन्फंट्री बटालियनमध्ये गजानन चव्हाण सुभेदार मेजर या अधिकारी पदावर कार्यरत आहेत. आफ्रिकेत गेल्यापासून तेथील लाखो रहिवाशांचा ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर न्यायरागोंगो या विनाशकारी आपत्तीपासून बचाव करणे, कांगो अंतर्गत बंड देशांचे हल्ले यातून कांगोचा बचाव करण्याचे कार्य सेवन मराठा व अन्य देशांच्या सेनेने केले आहे. वयाच्या अठराव्या वर्षी बेळगाव मराठा बटालियनमध्ये सैनिक म्हणून भरती झालेले सुभेदार मेजर गजानन चव्हाण यांनी आतापर्यंत बत्तीस वर्षे सेवा केली आहे. आपले वडील स्वातंत्र्यसैनिक कै. गोविंदराव चव्हाण, आई कै. कृष्णाबाई चव्हाण यांचा आदर्श व संस्कार याच्या जोरावर भारतीय सैनिकांकडून छत्रपती शिवाजी महाराज की जय, हर हर महादेव या युद्धगर्जनेसह सर्वोत्कृष्ट कार्य करून घेतलेल्या कामाबद्दल कांगोतील रहिवाशांमध्ये ‘इंडियन आर्मी’ बद्दल कमालीचा आदरभाव निर्माण झाला आहे. सेवन मराठा लाईट इन्फंट्रीच्या या कार्याची दखल संयुक्त राष्ट्र संघानेही घेतली व सुभेदार मेजर गजानन चव्हाण यांच्या युनिटला पदक देऊन सन्मानित केले आहे. त्याबद्दल निपाणी शहर व वासियांच्या वतीने त्यांच्या गौरव समारंभाचे आयोजन गुरुवारी दुपारी ४ वाजता अक्कोळ रोड, सोमनाथ मंदिर समोर पेट्रोल पंपा जवळ तेली बिल्डिंग येथे आयोजन केले आहे. तरी सर्व हितचिंतक व मित्रमंडळींनी उपस्थित राहावे, असे आवाहन गौरव कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

निपाणी अक्कोळ रोडवर ‘बर्निंग’ व्हॅनचा थरार

Spread the love  नागरिकांच्या सतर्कतेमुळे वाचले चालकाचे प्राण निपाणी (वार्ता) : भरधाव जाणाऱ्या मारुती व्हॅनने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *