Share
निपाणी (वार्ता) : बेळगाव येथील गोमटेश विद्यापीठ बेळगाव संचलित निपाणी हनुमान नगरातील गोमटेश इंग्लिश मीडियम स्कूल येथे कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष उदय पाटील उपस्थित होते. अश्विनी हत्ती यांनी स्वागत केले. भारत मातेच्या रक्षणासाठी आपल्या प्राणाचे बलिदान दिलेल्या वीर जवानांना यावेळी आदरांजली वाहण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषा परीधान केली होती. इयत्ता पाचवी व सहावीच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत सादर केले. भारताची एकात्मता या विषयावर एक लघु नाटीका सादर करण्यात आली. कारगील युद्धाचा इतिहास त्यात धारातीर्थी पडलेले जवान या घटनांना उजाळा आपल्या भाषणात उदय पाटील यांनी दिला.
यावेळी मुख्याध्यापिका ज्योती हरदी, दिपाली जोशी, सन्मती गौराई, महानंदा बक्कनवर यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास शहिस्ता सय्यद, भारती चौगुले ,प्राची शहा, नंदिनी पाटील, जयपाल कुडचे, सुभाष इंगळे आदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. शोभा इंगळे यांनी आभार मानले.
Post Views:
328
Belgaum Varta Belgaum Varta