Tuesday , March 3 2026
Breaking News

आप्पाचीवाडी येथे हायस्कूल इमारत शुभारंभ

Spread the love

 

पालक वर्गातून समाधान : मंत्री शशिकला जोल्ले यांचे प्रयत्न
कोगनोळी : आप्पाचीवाडी तालुका निपाणी येथे मंत्री शशिकला जोल्ले व खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या हायस्कूल इमारतीचा शुभारंभ मंत्री शशिकला जोल्ले व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजाराम खोत यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
यावेळी बोलताना मंत्री शशिकला जोल्ले म्हणाल्या, आप्पाचीवाडी येथील विद्यार्थ्यांना सर्व सोयींनी युक्त हायस्कूल इमारत बांधकाम करण्यात आली आहे. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांची सोय होणार आहे. गेल्या अनेक दिवसापासून हायस्कूल इमारतीची मागणी येथील नागरिक, पालक व शिक्षकांच्या कडून करण्यात आली होती. आज ती पूर्णत्वास आली आहे. मतदार संघातील विकास कामे करण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील आहोत. असे मनोगत व्यक्त केले.
यावेळी निपाणी ग्रामीण भाजपा अध्यक्ष पवन पाटील, निपाणीच्या गटशिक्षणाधिकारी रेवती मठद, ग्रामपंचायत अध्यक्षा शालन चव्हाण, उपाध्यक्ष आनंदा कुवाळे, हालसिद्धनाथ साखर कारखान्याचे संचालक प्रकाश शिंदे, एसडीएमसी उपाध्यक्षा नंदिनी मेथे, ग्रामपंचायत सदस्या मंगल जाधव, ग्रामपंचायत उपाध्यक्ष आनंदा कुवाळे, सह्याद्री फाउंडेशनचे उपाध्यक्ष के बी माने, आनंदा यादव, माजी सैनिक शिवगोंडा पाटील, राजाराम पाटील, राजेश डोंगळे, धनाजी पाडेकर, डॉक्टर जयसिंग मोरे, विश्वास आबणे, केरबा पाटील, रणजीत माने, अमोल काळे, सर्जेराव हेलाटे, सोहन खोत, कृष्णात पोटले, ए जी माने, बापूसो पुजारी, विनोद माने, संजय कोकणे यांच्यासह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

निपाणी अक्कोळ रोडवर ‘बर्निंग’ व्हॅनचा थरार

Spread the love  नागरिकांच्या सतर्कतेमुळे वाचले चालकाचे प्राण निपाणी (वार्ता) : भरधाव जाणाऱ्या मारुती व्हॅनने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *