नगराध्यक्ष जयवंत भाटले : हरी नगर शाळेत अंडी, केळी वाटप
निपाणी (वार्ता) : विद्यार्थ्यांना बुधवारपासून शाळेतून अंडी, केळी व चिक्की देण्यात येत आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षात ४५ दिवस वितरण होणार आहे. पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमधील कुपोषणाची समस्या दूर होणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राबवलेला हा उपक्रम सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना दिलासा देणार आहे, असे मत नगराध्यक्ष जयवंत भाटले यांनी व्यक्त केले.
राज्य सरकारने सरकारी शाळांमधील पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना अंडी, केळी आणि शेंगा चिक्की वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधीचा अधिकृत आदेश जारी करण्यात आला. त्या पार्श्वभूमीवर येथील हरी नगरातील सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळा येथे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजने मार्फत मुलांना, अंडी, केळी, शेंगदाणे चिक्की देण्याचा शुभारंभ करून नगराध्यक्ष भाटले बोलत होते.
यावेळी नगरसेविका सोनाली उपाध्ये यांनी मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमास सिद्धू माळी, गणेश बेळगली, सुभाष चन्ननावर, एसडीएमसी अध्यक्षा लता शिंदे, सुनील शेवाळे यांच्यासह शिक्षक विद्यार्थी, पालक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta