निपाणी : गेले 8 दिवस पावसाने उघडीप दिल्यामुळे शेतकरी सोयाबीन भुईमूग, मक्का पेरणी केलेल्या शेतामध्ये बैलजोडीच्या सहाय्याने कोळपी मारण्याच्या कामात व्यस्त असताना दिसत आहेत. तर कांही ठिकाणी हाताने ओढून कोळपी मारण्याचे काम करीत आहेत, कोळपी मारून झालेल्या वावरामध्ये लागलीच पाठीमागुन खुरप्याने भांगलन करून शेतीशिवारे स्वच्छ ठेऊन पिके जोमाने डोलताना शेतकरी आनंदून जातानाचे चित्र दिसत आहे. ऊसाची भरणी करणे, पाला ओढून काढणे, वैरण करणे, शेतातील कामे आवरण्याचा नादात शेतकरी दिसत आहेत, मजुरांचा तुटवडा जरी भासत असला तरी पैरा पद्धतीने काम चालू आहे. असाच एक व्हिडीओ अमलझरीतील युवा शेतकरी यश कौंदाडे यांच्या बैलजोडीच्या सहाय्याने कोळपणी करतांना अमलझरीतील शेतकरी…..
Belgaum Varta Belgaum Varta