रत्नशास्त्री ए. एच. मोतीवाला : नगारजी पठाण यांचा सत्कार
निपाणी (वार्ता) : नगरसेवक सद्दाम नगारजी व शेरगुलखान पठाण यांची बेळगाव व चिकोडी जिल्हा वक्फ बोर्डाच्या उपाध्यक्ष पदी निवड झाली आहे. हि निवड भूषणावह आहेच पण आजपर्यंत त्यांनी केलेल्या कामाची ही पोहच आहे. यापुढे या पदाचा उपयोग समाजाची उन्नती व समाजाच्या एकीसाठी व्हावा, असे मत रत्नशात्री ए. एच. मोतीवाला यांनी व्यक्त केले.
येथील अंजुमन हॉलमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत वक्फ बोर्डाच्या बेळगाव जिल्हा उपाध्यक्ष पदी सद्दाम नगारजी व चिकोडी जिल्हा उपाध्यपदी शेरगुलखान पठाण यांची निवड झाली आहे. त्या निमित्त आयोजित सत्कार समारंभात रत्नशास्त्री एच. ए. मोतीवाला सामाजिक सेवा फाउंडेशनच्यावतीने सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी शुभरत्न केंद्रचे रत्नशात्री ए. एच. मोतीवाला बोलत होते.
मोतीवाला म्हणाले, वक्फ बोर्डाच्या माध्यमातून समाजातील लोकांच्या अनेक समस्या दूर होऊ शकतात. ही पदेच समाजाला अधिक उंचीवर नेऊ शकतात. तरी नगारजी व पठाण यांनी या पदाच्या माध्यमातून समाजात परिवर्तन करावे.
यावेळी मलिक जमादार, सोहेल बावा, फयाज़ सौदागर, सरफराज सय्यद, अनीस सौदागर, जावेद फलटनकर, मिज़ान बदलवाले, शकील बावा, साजिद मुजावर, फैयाज़ पठान, फिरोज बदलवाले यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta