Tuesday , March 3 2026
Breaking News

दूधगंगा नदीचे पाणी पुन्हा पात्राबरोबर

Spread the love

 

कोगनोळी : कोगनोळी येथून राष्ट्रीय महामार्ग जवळ असणार्‍या दूधगंगा नदीचे पाणी पात्राबरोबर आले आहे.
शनिवार तारीख 6 व रविवार तारीख 7 रोजी पडलेल्या जोरदार पावसामुळे दूधगंगा नदीपात्रात पाण्याची वाढ झाली आहे.
दुधगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने कोगनोळी, सुळगाव, मत्तीवडे, हंचिनाळ, करनूर, वंदूर आदी गावच्या लोकांना पुराचा धोका वाढला आहे.
नदीकाठी असणार्‍या शेतीमध्ये पाणी गेल्याने शेतकर्‍यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे.
सलग दोन दिवस झालेल्या जोरदार पावसामुळे गावातील गटारी व ओढे नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. सुरु झालेला पाऊस कोकण पट्ट्यात मोठ्या प्रमाणात असल्यानेच दूधगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. सध्या कोगनोळी व परिसरामध्ये राहून राहून मोठ्या पावसाच्या सरी पडत आहेत. आणखी दोन-चार दिवस असाच पाऊस राहिला तर दूधगंगा नदीचे पाणी लगतच असणार्‍या गावाशेजारील वस्तीत शिरण्याची भीती निर्माण झाली आहे.
परिसरात सुरू झालेल्या या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतीची कामे जिथल्या तिथे थांबले आहेत.
येथील ग्रामपंचायत कार्यालयाकडून नदीकाठी असणार्‍या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे नदी पाणी पातळीत वाढत होत चालली आहे. सन 20 21 सालामध्ये झालेल्या पावसामुळे व दूधगंगा नदीला आलेल्या पुरामुळे अनेक लोकांना स्थलांतर करावे लागले होते. सध्या पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास परिसरातील लोकांना पुन्हा स्थलांतर करावे लागणार की काय अशी भीती व्यक्त होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

आगारातील खड्डे, कचऱ्यावरून आगार प्रमुखांची झाडाझडती

Spread the love  पंचहमी योजना पदाधिकारी आक्रमक आठवड्याभरात समस्या सोडविण्याच्या सूचना निपाणी (वार्ता) : प्रवाशांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *