Saturday , October 19 2024
Breaking News

म्युनिसिपल हायस्कूलमध्ये शैक्षणिक साहित्य वितरण

Spread the love
माजी विद्यार्थ्यांचा उपक्रम : नगराध्यक्षांची उपस्थिती
निपाणी (वार्ता) : येथील म्युनिसिपल हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना सन १९८२-८३ च्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांच्याकडून शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका आर. ए. चव्हाण तर प्रमुख पाहूणे म्हणून नगराध्यक्ष जयवंत भाटले  होते.
या कार्यक्रमासाठी माजी विद्यार्थी सरस्वती पाटील, आनंद पाटील, विठ्ठल शिंत्रे, अजित तोडकर, राजाराम सातवेकर, अनिल सांगावकर, सुनिल तावरे, राजकुमार जाधव, रमेश कुरणे, संजय जासूद यांनी विशेष पुढाकार घेऊन आठवीच्या विद्यार्थ्यांना स्कूल बॅग व नववी दहावीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक पॅड नगराध्यक्ष जयवंत भाटले यांच्या हस्ते वितरण केले.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन झाले. याप्रसंगी माजी विद्यार्थ्यांच्याकडून नगराध्यक्षांना, शाळेकडे लक्ष देऊन शाळेच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्याची विनंती केली.  नगराध्यक्ष जयवंत भाटले यांनी, शाळेच्या प्रगतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. निवृत्त क्रिडा शिक्षक नागावकर यांनी शाळेचा इतिहास आणि सद्य परिस्थिती विद्यार्थीसमोर मांडली. आपल्याकडून गरजू विद्यार्थ्यांना शालेय गणवेष देत असल्याचे सांगितले. तर एस. एल. पाटील यांनी शाळेसाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.यावेळी माजी विद्यार्थांची संघटना स्थापन करून संघटनेच्या माध्यमातून भविष्यात शाळा सुधारणेसाठी मदत करण्यासाठी प्रयत्न करण्याचे ठरले.
सरस्वती पाटील यांनी प्रास्ताविक केले.  विठ्ठल शिंत्रे यांनी आभार मानले.  राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी आजी, माजी, विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

निपाणीत उरुसाला प्रारंभ

Spread the love  धार्मिक कार्यक्रमासह शर्यती : कुस्ती मैदानाचेही आयोजन निपाणी (वार्ता) : येथील संत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *