वाहनधारकांनी घेतली धडकी : विविध कागदपत्रांची तपासणी
निपाणी (वार्ता) : चिकोडी येथील प्रादेशिक वाहतूक खात्याच्या अधिकार्यांनी शहरात अचानकपणे गुरुवारी (ता. 11) सकाळपासून सर्वच चार चाकी वाहनांची तपासणी सुरू केली होती. त्यामुळे आठवडी बाजारा दिवशी झालेल्या या कारवाईमुळे वाहनधारकांमध्ये धडकी भरली होती. अधिकार्यांनी विविध कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर कागदपत्रे नसलेला व अंधारकांना दंडही ठोठावला.
आरटीओ अधिकार्यांनी गुरुवारी (ता.11) सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास आपल्या पथकासह बस स्थानक परिसरात सर्वच वाहनांची झडती घेतली. त्यामध्ये विमा, परवाना नूतनीकरण, ज्यादा क्षमतेने प्रवाशांची वाहतूक करणारी खाजगी वाहनांसह इतर वाहनांची तपासणी केली. त्यामध्ये बस स्थानक परिसरात चार ते पाच खासगी वाहनावर कारवाई करून त्यांना दंडही ठोठावला. त्यानंतर गीतांजली चित्रमंदिर आणि मुरगुड रस्त्यावरील उड्डाणपूल परिसरात थांबून सर्वच वाहनांची तपासणी केली. कागदपत्रे नसलेल्या वाहनावर कारवाई केली. आठवडी बाजारा दिवशी अचानकपणे झालेले या कारवाईमुळे अनेक खासगी वडाप वाहनधारक बस स्थानक परिसरातून काढता पाय घेतला. यावेळी काही अनधिकृत रिक्षा चालकावरही कारवाई केली. एकंदरीत तब्बल दोन महिन्यानंतर झालेले या कारवाईमुळे खाजगी वाहनधारका मध्ये अस्वस्थता पसरली होती. दुपारनंतर आरटीओ चिक्कोडीकडे परतल्याने बस स्थानक परिसरात पुन्हा खाजगी वाहनधारकांची गर्दी दिसून आली.
Belgaum Varta Belgaum Varta