कॉ. उमेश सूर्यवंशी : निपाणीत क्रांतिदिनानिमित्त व्याख्यान
निपाणी (वार्ता) : १९४२ साली महात्मा गांधीजी व अन्य नेत्यांनी इंग्रजांविरोधात करेंगे या मरेंगे अशी हाक देत क्रांतीचा नारा दिला. यातून देश स्वांतत्र्याला गती मिळाली. आजच्या तरुणांनी स्वातंत्र्य लढ्यातील नेत्यांचा आदर्श घेऊन वाटचाल करणे आवश्यक आहे. अशावेळी खरा इतिहास जाणून घेणे आवश्यक आहे. समृद्ध अशा समाज निर्मितीसाठी काम करणे आवश्यक आहे, असे मत कोल्हापूर येथील कॉ. उमेश सूर्यवंशी यांनी व्यक्त केले.
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव तसेच क्रांती दिनानिमित्त येथील शिवराज्यमंचतर्फे येथील ग्रंथालयात कॉ. उमेश सूर्यवंशी यांचे ‘क्रांती दिन आणि आजचा तरुण’ या विषयावर व्याख्यान पार पडले. अध्यक्षस्थानी ग्रंथपाल गोरखनाथ मधाळे होते. सचिन लोकरे, सतिश कराळे यांनी सदर व्याख्यानाचे संयोजन केले होते. यावेळी माजी आमदार प्रा. सुभाष जोशी, ज्येष्ठ विचारवंत प्रा. अच्युत माने, सुधाकर माने, दलित क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष अशोककुमार असोदे, युवा उद्योजक रोहन साळवे, कबीर वराळे, अशोक खांडेकर यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta