सौंदलगा : भारत देशाच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिना निमित्त श्री नृसिंह विठ्ठल ग्रुप, विठोबा गल्ली, सौंदलगा यांच्यावतीने सौंदलगा येथे “जिवनधारा ब्लड बँक” कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार (ता.१४) रोजी सकाळी ८ ते दुपारी २ पर्यंत रक्तदान शिबीर श्री नृसिंह मंदिर, सौंदलगा येथे होणार आहे.
श्रीनृसिंह-विठ्ठल सोशियल वर्क ग्रुप, सौंदलगा आयोजित व श्री सत्यसाई सेवा समिती कोगनोळी यांच्यातर्फे मोफत आरोग्य सेवा तपासणी शिबिर सौंदलगा येथे होणार आहे. तरी यांचा सर्व ग्रामस्थांनी लाभ घ्यावा ही विनंती.
या शिबिरासाठी डॉ. केदार तोडकर (एम. डी. आयुर्वेद) तपासणीसाठी उपस्थित राहणार आहेत.
रविवार (ता.१४) सकाळी १०.०० पासून रूग्ण असे पर्यंत. तरी सौंदलगा गावातील सर्व ग्रामस्थानी या शिबीरात सहभागी व्हावे, असे मंडळाच्या सभासदांनी सांगितले. रक्तदान शिबीरामध्ये प्रत्येक रक्तदात्यास मंडळाकडून आकर्षक कॉलेज बँग भेट म्हणून देण्यात येईल.
Belgaum Varta Belgaum Varta