Wednesday , March 4 2026
Breaking News

बोरगाव परिसरात अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन साजरा

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : बोरगाव शहर आणि परिसरात विविध उपक्रमांनी अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन साजरा झाला.
बोरगाव येथील अरिहंत सौहार्द संस्थेत कार्याध्यक्ष अभिनंदन पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात झाले. प्राथमिक कृषी पतीने सहकारी संघात अध्यक्ष युवा नेते उत्तम पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण तर उपाध्यक्ष बाळासाहेब सातपुते यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात झाले.
अरिहंत स्पिनिंग मिल येथे संचालक राजेंद्र ऐदमाळे व बाबासाहेब बेडकिहाळे यांच्या उपस्थितीत संचालक अभिनंदन पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.
अरिहंत मराठी माध्यम प्राथमिक व माध्यमिक शाळेत लेफ्टनंट अक्षय गुरव यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.
बोरगाव नगरपंचायत कार्यालयात नगरसेविका संगीता शिंदे व शोभा हावले यांच्या हस्ते प्रतिमा पूजन तर मुख्याधिकारी पी. ए. कल्याणशेट्टी यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. आर. ए. पाटील इंग्रजी माध्यम शाळेत संचालक अशोक बंकापुरे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन तर विनयश्री पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.

About Belgaum Varta

Check Also

निपाणी परिसरात होळीचा सण भक्तीभावाने

Spread the love  आता सर्वांनाच रंगपंचमी सणाची आतुरता निपाणी (वार्ता) : शहर, उपनगर आणि ग्रामीण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *