Monday , September 21 2026
Breaking News

पायोनियर बँकेच्या वतीने स्वातंत्र्य दिन साजरा

Spread the love

बेळगाव : 116 वर्षाची परंपरा असलेल्या येथील सर्वात जुन्या बेळगाव पायोनियर अर्बन बँकेच्या वतीने 75 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. संस्थेचे चेअरमन श्री प्रदीप अष्टेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन हवेत फुगे सोडन्यात आले. तत्पूर्वी विद्यार्थ्यांच्या बँड पथकाद्वारे संचलन करून सर्व संचालक व कर्मचारी बँकेकडे पोहोचले. सर्व संचालकांनी व कर्मचाऱ्यांनी पांढरा कुर्ता व पांढरा पायजमा परिधान करून तसेच भगवे फेटे बांधून केलेल्या या संचलनाकडे व कार्यक्रमाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सर्वांनी हातात तिरंगा घेऊन तिरंग्याला मानवंदना दिली. याप्रसंगी बँकेच्या सीईओ अनिता मूल्या यांनी सर्वांचे स्वागत केले याप्रसंगी बँकेचे व्हा. चेअरमन रणजीत चव्हाण पाटील, संचालक सर्वश्री अनंत लाड, शिवराज पाटील, गजानन पाटील, रमेश शिंदे, रवी दोड्डनवर, सुहास तरळ, मारुती शिगिहल्ली, गजानन ठोकणेकर, विद्याधर कुरणे, सौ. सुवर्णा शहापूरकर, सौ. लक्ष्मी कानूरकर यांच्यासह कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

 

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *