बेळगाव : निपाणी तालुक्यातील बेनाडी येथे घराचे कुलूप तोडून लाखोंचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
12 ऑगस्ट रोजी दुपारी 3 ते 5 च्या दरम्यान घराचे कुलूप तोडून तिजोरीतील लॉकर फोडून 1.32 लाख रुपये घेऊन पोबारा केला. नऊ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने माधुरी शारद पिंपळे यांनी निपाणी ग्रामीण पोलिस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी तपास सुरू केला असता एका आरोपीला अटक करून त्याच्याकडून 60 ग्रॅम सोन्याचे दागिने, चोरीत वापरलेली मोटारसायकल असा एकूण 3 लाख 92 हजार रुपयाचा ऐवज जप्त करण्यात आला.
चिक्कोडीचे डीएसपी बसवराज यलिगार यांच्या मार्गदर्शनाखाली निपाणीचे सीपीआय संगमेश शिवयोगी, निपाणी ग्रामीण पोलिस ठाण्याचे पीएसआय अनिल कुंभार, कर्मचारी एस. एस. कडगौडर, व्ही. जी. माने, सीएच, बी. के. नगारी, के. डी. हिरेमठ, एम. एफ. नदाफ, अमर चंदनशिव, राघवेंद्र मेलगडे, प्रशांत कुदरी, प्रभू सिद्धातगीमठ यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
या कारवाईचे पोलीस अधीक्षक व अपर पोलीस अधीक्षक, बेळगाव यांनी कौतुक केले.
Belgaum Varta Belgaum Varta