सौदलगा : येेेथील मराठी शाळेत सुशोभीकरण करण्यासाठी शोभेच्या रोपांची देणगी देतेवेळी प्रारंभी अनिल शिंदेनी मान्यवरांचे स्वागत केले. आयु.नागोजी संतराम मेस्त्री यांच्या स्मरणार्थ विक्रम नागोजी मेस्त्री, कुमार नागोजी मेस्त्री, दिनकर नागोजी मेस्त्री यांच्याकडून सरकारी मराठी मुलांची शाळा सौंदलगा यांना “झाडे लावा झाडे जगवा” या उद्देशाने दलित क्रांती सेना सौंदलगा या शाखेच्या वर्धापन दिनानिमित्त अध्यक्ष अकबर कटके, उपाध्यक्ष अजित कांबळे, खजिनदार अक्षय मेस्त्री व संघटनेला झाडे देण्याचे मार्गदर्शन आयु. प्रसन्न दिनकर मेस्त्री व आयु. सुनील बापू कांबळे सर यांनी केले.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक धनंजय ढोबळेनी रोपे स्विकारली आणि मान्यवरांचे आभार मानले. यावेळी दलित सेनेचे कार्यकर्ते, शाळेचा स्टाफ विद्यार्थी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta