निपाणी : निपाणीजवळच असलेल्या अमलझरी गावातील युवा नेतृत्व, युवा ग्राम पंचायत सदस्य श्री. अभिजित शशिकांत कौंदाडे, तवंदीचे सामाजिक कार्यकर्ते श्री. बाबासाहेब राजाराम पाटील ऊर्फ गोल्डन बाबा व यरणाळचे ज्येष्ठ राजकारणी श्री. दिनकरमामा लकडे यांचा वाढदिवस श्री हनुमान तरुण मंडळच्या सर्व कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन गावातील सर्व मंडळे, ग्रामस्थ, ज्येष्ठ नागरिक, स्थानिक नेते यांच्या सानिध्यात मोठ्या जल्लोषात श्री दत्त मंदिर येथे करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्तविक श्री. दत्ता खोत सर यांनी केले तर सूत्रसंचालन सचिन कौंदाडे यांनी करून आलेल्या मान्यवरांचे सत्कार हनुमान मंडळातील कार्यकर्त्यांकडून शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष निपाणीचे जनक श्रीमंत दादाराजे देसाई निपाणकर सरकार होते तर प्रमुख पाहुणे निपाणी मतदारसंघाचे युवा नेते श्री. उत्तमआण्णा रावसाहेब पाटील हे होते. कार्यक्रमासाठी आलेल्या मान्यवरांनी आपल्या परीने, आत्मीयतेने ज्यांचा वाढदिवस आहे त्यांचा आणि त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल मनोगत व्यक्त केली.
उत्तमआण्णा पाटील यांनी या तिघांचा शाल श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन प्रथमतः सत्कार केला व मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, यरणाळ ग्रा. पं. च्या व्याप्तीत अमलझरी, तवंदी, गव्हाणी व यरणाळ ही चार गाव येतात आणि या गावातील ग्रा. पं. सदस्य, सामाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठ नेते या तिघांचा वाढदिवस अमलझरी या गावात श्री दत्त मंदिर येथे चारही गावातील ज्येष्ठ नेते, कार्यकर्ते, ग्रा. पं. सदस्य, युवक मंडळातील पदाधिकारी या सर्वांना एकत्र घेऊन हा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा कार्यक्रम हनुमान तरुण मंडळ, इतर मंडळातील पदाधिकारी, ग्रामस्थ यांनी करून ग्राम पंचायतीत एक आदर्श निर्माण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे,त्याबद्दल आपण त्यांचे अभिनंदन करतो. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कृष्णात बाडकर, राजेंद्र कौंदाडे, दादासो पाटील, रविंद्र मोहिते, मलगोंडा कंकणवाडे, सचिन कौंदाडे, शिवाजी खोत, महादेव पाटील, अतुल कोकरे, बाळू लुगडे, यलगोंडा रेपे, कुमार कंकणवाडे, रमेश कंकणवाडे, सतीश कंकणवाडे, किरण पाटील, सनी देसाई, धीरज पाटील, महेश कदम, विलास इंगळे, सूरज पाटील, गणेश कदम, गणेश चव्हाण, निखिल रेपे, नयन रेपे, अमेय कोकरे, यश कौंदाडे, प्रथमेश रेपे, कुणाल पाटील, हर्षद बाडकर, गणेश कंकणवाडे, सुहास कंकणवाडे, दत्ता पाटील यांनी परिश्रम घेतले.
गावातील सर्व मंडळाच्या वतीने, ज्येष्ठ नागरिकांच्यावतीने, या तिघांचा सत्कार करण्यात आला व केक कापून वाढदिवस मोठ्या जल्लोषात करण्यात आला. शेवटी कृष्णात बाडकर यांनी अभि कौंदाडे हि एक व्यक्ती नसून ती सर्व युवकांची, ग्रामस्थांची ताकद आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने फक्त केक कापून वाढदिवस न करता, मराठी शाळेत SDMC कमिटी सदस्य व शिक्षकांच्या समवेत रोपं वाटप कार्यक्रम, सायंकाळी मनोरंजन म्हणून हातात कासरा धरून बैल पळविणे ही स्पर्धा देखील ठेवली ती सुद्धा सर्वांच्या सहकार्याने ही मोठी बाब त्यांच्यात आहे ते आणि त्यांचं पूर्ण परिवार गावातील सामाजिक, शैक्षणिक, कार्यात नेहमी अग्रेसर असतात आहेत आणि राहणारच त्यात काही शंकाच नाही असे बोलून आभार मानून जेवणाच्या मेजवाणीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
Belgaum Varta Belgaum Varta