सौंदलगा : कोडणी गावचे ग्राम सहाय्यक रावसाहेब शिरगावे यांना उत्कृष्ट प्रशासकीय कामकाज केल्याबद्दल निपाणी तालुका प्रशासनाच्या वतीने प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. स्वातंत्र्य दिनादिवशी हा सोहळा निपाणी येथील मुनिसिपल हायस्कूलच्या मैदानावर संपन्न झाला. यावेळी तहसीलदार प्रवीण कारंडे यांनी त्यांना उत्कृष्ट कार्याबद्दल प्रशस्तीपत्र देऊन सन्मान केला.
शिरगावे हे मूळचे बुदिहाळ तालुका निपाणी येथील रहिवासी असून त्यांनी कोडणी गावात ग्राम सहाय्यक म्हणून कार्य करत असताना सर्व प्रकारची कामे तत्परतेने मार्गी लावली आहेत. त्यामुळे त्यांच्या कार्याची दखल घेऊन तालुका प्रशासनाने हा सन्मान केला. याप्रसंगी खासदार अण्णासाहेब जोले, तहसीलदार प्रवीण कारंडे, उपतहसीलदार अभिषेक बोंगाळे, निपाणीचे नगराध्यक्ष जयवंत भाटले, उपनगराध्यक्ष नीता बागडे, आयुक्त जगदीश हुलगेजी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta