Thursday , September 19 2024
Breaking News

निपाणीतील दोन दुकाने आगीच्या भक्षस्थानी

Spread the love

सहा लाखाचे नुकसान : शॉर्टसर्किटने आग लागल्याचा संशय
निपाणी (विनायक पाटील) : येथील भाग्यश्री वाईन शेजारी असलेल्या एंटरप्राइजेस आणि एसआरएस सलून दोन दुकानांना सोमवारी (ता.22) मध्यरात्री बाराच्या सुमारास आग लागून दोन्ही दुकानातील सर्वच साहित्य बेचिराख झाले आहे. या घटनेत दोन्ही दुकानांचे सुमारे सहा लाखाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अग्निशामक दल आणि हेस्कॉम अधिकारी व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी आल्याने मोठा अनर्थ टाळला आहे. सदरची आग शॉर्ट सर्किटने लागल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, आश्रयनगर येथील सतीश नारायण माने यांचे भाग्यश्री वाईन्स शेजारी गेल्या पंधरा वर्षापासून अजिंक्य एंटरप्राइजेस या नावाने गोळा बिस्किटे व इतर साहित्याचे दुकान आहे. नेहमीप्रमाणे ते आपले दुकान बंद करून रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घरी गेले होते. त्यानंतर रात्री बारा वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली.
माने यांच्या दुकानात शेजारीच असलेल्या कटिंग सलून च्या दुकानालाही आग लागली. आग मोठी असल्याने नागरिकांना विझवणे कठीण झाले.
परिसरातील काही नागरिकांना त्याची माहिती मिळताच सतीश माने यांना दूरध्वनीवरून कल्पना दिली. शिवाय तात्काळ अग्निशामक दल व हेस्कॉमच्या अधिकार्‍यांना माहिती दिली. तात्काळ अग्निशामक बंबाच्या जवानांनी दोन्ही दुकानाला लागलेली आग आटोक्यात आणली. त्यामुळे या दोन्ही दुकानांच्या शेजारीच बरीच किराणा व इतर दुकाने असून अधिकार्‍यांच्या सतरतेमुळे ती आगीपासून वाचली आहेत.शिवाय हेस्कॉमच्या अधिकारी तात्काळ परिसरातील वीजपुरवठा खंडित केला. त्यामुळेच मोठा अनर्थ टळल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती.
आगीमध्ये सतीश माने यांच्या दुकानातील फरसाणा, गोळ्या, बिस्किटे, पत्रावळी, ग्लास, प्लेट, कापडी पिशव्या, पंख्यासह पंधरा दिवसांपूर्वी दुकानात केलेले नवीन फर्निचर सुद्धा आजीच्या बक्षीस आणि पडले आहे. त्यामुळे माने यांचे सुमारे साडेतीन लाखाचे नुकसान झाले आहे.
सागर तानाजी राऊत यांच्या एसआरएस सलून दुकानाला लागलेल्या आहेत दोन खुर्च्या फर्निचर दोन पंखे एअर कुलर, केस कापण्याचे साहित्य इन्वर्टर बॅटरी सह दुकानाच्या छताचेही मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे राऊत यांचे सुमारे अडीच लाखाचे नुकसान झाले आहे. हेस्कॉमच्या अधिकार्‍यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. घटनेची माहिती मिळताच नगराध्यक्ष जयवंत भाटले व सहकारी नगरसेवकांनी भेट देऊन पाहणी केली.
—-
गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर दुकान भरले
गणेशोत्सव आठवड्यावर आल्याने सतीश माने यांनी आपल्या दुकानात दोन दिवसांपूर्वीच सुमारे दोन ते अडीच लाखाचा माल भरला होता. पण अचानक लागलेल्या आगीतसर्व साहित्य जळून खाक झाल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
—-
अग्निशामक दलाची तत्परता
आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या अधिकार्‍यांनी तत्परता दाखवून तात्काळ घटनास्थळी भेट देऊन आग आटोक्यात आणली. वरील दोन्ही दुकानाच्या शेजारीच भाग्यश्री वाईन्स असून या दुकानाला आग लागली असती तर मोठ्या दुर्घटनेला परिसरातील व्यवसायिकांना सामोरे जावे लागले असते.

About Belgaum Varta

Check Also

देशाच्या बांधणीमध्ये अभियंत्यांचे मोठे योगदान

Spread the love  मंडल पोलीस निरीक्षक तळवार; निपाणीत अभियंता दिन निपाणी (वार्ता) : एम. विश्वेश्वरय्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *