श्रावणानिमित्त आयोजन : हजारो कुस्ती शौकिनांची उपस्थिती
कोगनोळी : श्रावण महिन्याच्या निमित्ताने जय हनुमान तालीम मंडळ व समस्त ग्रामस्थ मत्तिवडे तालुका निपाणी येथे आयोजित कुस्ती मैदानात प्रदीप ठाकूर सोलापूर व श्रीमंत भोसले इचलकरंजी यांच्यात झालेल्या कुस्तीत श्रीमंत भोसले यांनी बाजी मारून रोख रक्कम व ढाल पटकावली.
ग्रामपंचायत सदस्य राजेश डोंगळे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते हनुमान प्रतिमेची पूजन झाले. भीमराव पांडुरंग यादव यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून मैदान भूमिपूजन झाले.
उपस्थित मान्यवर व पैलवानांचे स्वागत परशुराम उर्फ सोनू कदम यांनी केले.
यावेळी निवेदक म्हणून राजाराम चौगुले खेबवडे यांनी काम पाहिले.
दोन नंबरची कुस्ती सुनील करवठे पुणे व प्रकाश इंगळगी कर्नाटक यांच्यात बरोबर झाली.
तीन नंबरची कुस्ती अजित सूर्यवंशी सांगली व बाळू शिंदे कर्नाटक यांच्या बाळू शिंदे विजयी झाले.
यावेळी लहान मोठ्या 150 कुस्त्या झाल्या.
यावेळी पंच म्हणून सुरेश गुरव, कृष्णात डोंगळे, अप्पा साठे, रावसाहेब बेडकिहाळे, बाळासाहेब साठे, शिवाजी जाधव, रामा केसरकर, नामदेव केसरकर, कृष्णात खाडे, संजय काटे यांनी काम पाहिले.
बक्षीस वितरण ग्रामपंचायत सदस्य जयसिंग मोरे, सयाजी केसरकर, नामदेव केसरकर, विठ्ठल बेडगे, माजी जिल्हा पंचायत सदस्य जयवंत कांबळे, राजेश केसरकर, कृष्णात खाडे, चेअरमन सचिन खोत, पांडुरंग कोंडेकर, विक्रीकर निरीक्षक बंडा पाटील, राहुल खाडे, सर्जेराव मोरे, सदाशिव गुरव, लक्ष्मण भिवसे, अनिल जाधव, बाजीराव ढगे, शिवाजी संकपाळ बुद्धिहाळ, सागर सादळे इचलकरंजी, रामा डोंगळे यांच्यासह विविध सेवा संस्थेचे पदाधिकारी, ग्रामस्थ, कुस्ती शौकीन उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta