उत्तम पाटील : शुभरत्न केंद्रास सदिच्छा भेट
निपाणी (वार्ता) : दिवंगत एच. ए. मोतीवाला यांनी निपाणी शहर आणि परिसरात मोठे सामाजिक कार्य केले आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र ए. एच. मोतीवाला हे अशहिमतीने त्यांची उणीव भरून काढत आहेत. एच. ए. मोतीवाला यांचा वारसा खंबीरपणे ते चालवत असून त्यांचाही नावलौकिक वाढत आहे. ए. एच. मोतीवाला हे समाजकार्यात अग्रेसर आहेत, असे मत निपाणी भागाचे युवा नेते उत्तम पाटील यांनी व्यक्त केले. येथील नेहरू चौकात एच. ए. मोतीवाला संस्थापित शुभरत्न केंद्रास पाटील सदिच्छा भेट दिली. यावेळी दिवंगत रत्नशाश्त्री एच. ए. मोतीवाला यांचे पुत्र व रत्नशास्त्री ए. एच. मोतीवाला यांनी त्यांचे स्वागत करून अखंड प्रवाळातील गणेशाच्या मूर्तीची प्रतिमा त्यांना भेट दिली. त्याप्रसंगी पाटील बोलत होते.
उत्तम पाटील यांनी सदिच्छा भेटीप्रसंगी एच. ए. मोतीवाला यांच्या सामाजिक कार्यास उजाळा दिला. यावेळी रत्नशास्त्री ए. एच. मोतीवाला यांनी उत्तम पाटील यांचे स्वागत करून विचारपूस केली. त्यांनी यावेळी दुर्मिळ असलेल्या १५५ कॅरेट प्रवाळमधील गणेशाच्या मूर्तीची प्रतिमा त्यांना भेट दिली व या मूर्तीचे महत्व सांगितले. शिवाय निपाणी मतदारसंघात नैसर्गिक आपत्तीच्या वेळी अरिहंत उद्योग समूहाचे सामाजिक कार्य उल्लेखनीय असल्याचे सांगितले.यावेळी नगरसेवक संजय सांगावकर, संजय पावले, शिरीष कमते, इम्रान मकानदार, प्रा. सचिन खोत, अनिल संकपाळ यांच्यासह नगरसेवक, कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta