Monday , September 21 2026
Breaking News

सोनाली फोगट मृत्यू प्रकरणाला नवं वळण, सीसीटीव्हीत धक्कादायक बाब उघड, दोन सहकाऱ्यांना बेड्या

Spread the love

 

मुंबई : अभिनेत्री आणि भाजपा नेत्या सोनाली फोगट यांच्या मृत्यूप्रकरणी नवी माहिती समोर आली आहे. गोव्यातील एका रेस्टॉरंटमध्ये पार्टीदरम्यान फोगट यांच्या दोन सहकाऱ्यांनी त्यांना जबरदस्तीने घातक पेयं प्यायला दिले, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या पेयाच्या सेवनानंतर फोगट यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर रुग्णालयात दाखल करताच त्यांना डॉक्टरांकडून मृत घोषित करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

रेस्टॉरंटमधील सीसीटीव्ही कॅमेरा आणि काही जणांच्या कबुली जबाबातून ही बाब उघडकीस आली आहे. याप्रकरणी सुधीर संगवान आणि सुखविंदर सिंग या फोगट यांच्या दोन सहकाऱ्यांना पोलिसांनी संशयित म्हणून अटक केली आहे. घटनेचे पुरावे नष्ट करण्यात येऊ नयेत, यासाठी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. “रेस्टॉरंटमधील सीसीटीव्ही तपासल्यानंतर सुधीरने सोनालीला जबरदस्तीने एका बाटलीतील पेय पाजल्याचे समोर आले आहे”, असे पोलिसांनी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे.

४२ वर्षीय सोनाली फोगट यांचा उत्तर गोव्याच्या अंजुनामधील सेंट अँन्थोनी रुग्णालयात २३ ऑगस्टला मृत्यू झाला होता. कुटुंबीयांनी त्यांच्या निधनाबाबत संशय व्यक्त केल्यानंतर याप्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. शवविच्छेदन अहवालात फोगट यांच्या शरिरावर जखमा आढळून आल्या होत्या. फोगट यांच्या मृत्यूचं खरं कारण शोधण्याची आवश्यकता असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आल्यानंतर पोलिसांकडून या प्रकरणाचा सर्वांकष तपास करण्यात येत आहे.

About Belgaum Varta

Check Also

फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; ११ कामगारांचा मृत्यू

Spread the love    कारखाना जमीनदोस्त; अनेक जण गंभीर जखमी, बचावकार्य सुरू कौशांबी (उत्तर प्रदेश) …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *