कोगनोळी : हंचिनाळ के.एस (तालुका निपाणी) येथे मंत्री शशिकला जोल्ले व खासदार आण्णासाहेब जोल्ले यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या उज्वल गॅस योजनेतून गौराबाई पाटील, छबुताई भिवसे, भाग्यश्री पाटील-चिनाप, शामबाला भिवसे, उमा जाधव या गरीब व गरजू महिलांना गॅस सिलेंडरचे वितरण आडी – हंचिनाळ ग्रुप ग्रामपंचायतीचे अध्यक्ष बबन हावलदार, ग्रामपंचायत सदस्य एम. वाय. हावलदार व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी निवृत्त शिक्षक आर. एल. चौगुले हे होते.
आण्णासो आवटे-राजमाने, आनंदा शंकर चौगुले, संजय आप्पासो वाघमोडे, अमृता रत्नाप्पा चौगुले या कोरोनाने मृत्यू पावलेल्या नागरिकांच्या वारसांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. अपघात मृत्यू झालेले सतिश महादेव हळीज्वाळे यांच्या वारसांना २० हजार रुपयांचा धनादेश तर अर्जुन वराळे यांच्या निधनाबद्दल त्यांच्या वारसांना ५ हजार रुपयांचा धनादेशही यावेळी वितरण करण्यात आला. तसेच हनुमान मंदिरासाठीही ५ लाखाचा धनादेश मंदिर समितीकडे देण्यात आला. ही सर्व मदत शासनातर्फे देण्यात आली.
यावेळी माजी ग्रामपंचायत उपाध्यक्ष कुमार गुरव, पीकेपीएस संघाचे माजी संचालक सिताराम कोंडेकर, भक्ती योगाश्रम मठाच्या कमिटीचे अध्यक्ष अनिल मंगसुळे, गणेश मंदिर सेवा समितीचे अध्यक्ष मधुकर चौगुले, हनुमान मंदिर कमिटीचे अध्यक्ष अनिल पाटील, सुधाकर पोवार, गुंडू पंचम, रावसाहेब नलवडे, सिद्धगोंडा वंदूरे, प्रशांत पाटील, सागर चौगुले, अशोक कोंडेकर, साजन घस्ते, विद्याधर मजगे, गणेश कोंडेकर, अनिल पोतदार, राजू सुतार, सुनिल कांबळे, निवृत्ती वंदूरे, रावसाहेब नलवडे, सदाशिव गवळी, शिवगोंडा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta