
वारकरी, भाविकांचा उत्साह : माऊली, माऊलीचा गजर
निपाणी (वार्ता) : टाळ मृदंगाचा गजर, हातात पताका, विणेकरी, चोपदार, पालखी सोहळा, आणि माऊली माऊली च्या गजरात संत ज्ञानेश्वर माऊलींच्या अंकली येथील अश्वांचे येथील म्युनीशिपल हायस्कूलच्या पटांगणावर रविवारी (ता.२८) दुपारी प्रथमच श्रीमंत दादाराजे देसाई निपाणकर सरकार, श्रीमंत विजयराजे देसाई निपाणकर सरकार, श्रीमंत राजेशराजे देसाई निपाणकर सरकार, श्रीमंत शरदराजे देसाई निपाणकर सरकार यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत माऊली अश्वाचा रिंगण सोहळा पार पडला. त्यामुळे निपाणी शहर व ग्रामीण भागातील वारकरी व भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. या सोहळ्यात परिसरातील ५० वारकरी मंडळांचा समावेश होता महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.
रविवारी (ता. २८) सकाळी ग्रंथराज ज्ञानेश्वर माऊलींचे पारायण झाले. त्यानंतर निपाणकर रावाड्यातून दिंडी सोहळ्याला प्रारंभ करण्यात आला. यामध्ये माऊलीचे अश्व, पालखी व वारकरी सहभागी झाले होते. म्युनिसिपल हायस्कूल मैदानावर गोल रिंगण सोहळा पार पडला. यावेळी महिलांनी झिम्मा, फुगडीचा खेळ सादर त्यानंतर राम मंदिर येथे भाविकांनी माऊलीच्या आश्वाचे दर्शन घेतले.
सकाळी १० वाजता अंकलीकर सरकार यांच्या मानाच्या अश्वाचे निपाणकर राजवाड्यात आगमन झाले यानंतर अश्वांची पाद्यपूजा होऊन दिंडी चाटे मार्केट, कन्या शाळा, बेळगाव नाकामार्गे म्युनिसिपल हायस्कूल मैदानावर दाखल झाले. या मैदानावर दुपारी १२ ते २ वाजेपर्यंत गोल रिंगण
पार पडला. येथून सटवाई रोड, दलाल पेठ, तानाजी चौकमार्गे माऊलींचे अश्व निपाणकर वाड्यात आल्यानंतर सोहळ्याची सांगता झाली.
या सोहळ्यासाठी वाहनांची पार्किंग व्यवस्था म्युनिसिपल हायस्कूलच्या पाठीमागील बाजूला केली होती. याप्रसंगी श्रीमंत विजयराजे देसाई सरकार, रत्नशास्त्री ए. एच. मोतीवाला, शरदराजे, राजेशराजे, सुधाकर कुराडे, प्रा. भारत पाटील, सुजित गायकवाड, गोपाळ शिंदे, प्रा. भारत पाटील यांच्यासह निपाणी शहर व ग्रामीण भागातील वारकरी व भाविक उपस्थित होते.
—
व्हाईट आर्मीसह स्वयंसेवक
शहरात प्रथमच मोठ्या प्रमाणावर माऊलीचा रिंगण सोहळा होत आहे. त्यामुळे शहर आणि ग्रामीण भागातील वारकरी व भाविकांची मोठी गर्दी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर व्हाईट आर्मी, अनिरुद्ध उपासना केंद्र, कणगला येथील येथील मावळा ग्रुप, व्ही एस एम एस स्वयंसेवक, देवचंद महाविद्यालयातील एनएसएसचे स्वयंसेवक, केएलई महाविद्यालयातील कॅडेट, वीरभद्रेश्वर मंडळाचे कार्यकर्ते शिस्तीसाठी परिश्रम घेतले.
Belgaum Varta Belgaum Varta