कोगनोळी : इनव्हिटेशन एआरएसईसी एशिया स्पीड स्केटिंग च्या वतीने ओपन रोलर स्केटिंग स्पीड प्रमोशनल स्पर्धा 2022 या थायलंड देशात पार पडल्या. या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत आराध्या पाटील वय चार हिने तीन सुवर्णपदक पटकावले आहेत.
सदर स्पर्धा आशिया स्पीड स्केटिंग च्या वतीने पटाया थायलंड येथे झाल्या. या आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत कोल्हापूरच्या चिमुकल्या आराध्या पद्मराज पाटील हिने सहभाग घेऊन यश संपादन केले.
स्पर्धेमध्ये भारतासह थायलंड, कांबोडिया, मलेशिया देशातील 110 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. आराध्या हिने 100 मीटर, पाचशे मीटर, 1000 मीटर स्पर्धेत भाग घेतला होता. तिच्या नावे आतापर्यंत तीन नॅशनल रेकॉर्ड असून तिला आतापर्यंत जिल्हास्तरावरील व राज्यस्तरावरील तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत विविध पदके व पुरस्कार मिळाले आहेत.
आराध्या पाटील ही कोगनोळी येथील डॉक्टर बाळासाहेब पाटील व पुष्पा पाटील यांची नात असून तिला सदर स्पर्धेसाठी एस के रोलर स्केटिंग अकॅडमीचे प्रशिक्षक सुहास कारेकर, गोजिरा कारेकर यांचे मार्गदर्शन लाभले. वडील पद्मराज पाटील व आई श्रीदेवी पाटील, बहीण गुंजन, काका चेतन पाटील यांचे प्रोत्साहन मिळाले आहे.
तिला मिळालेल्या यशाने तिचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta